Sunday , July 26 2026
Breaking News

“बेळगाव वार्ता”च्या रायगड जिल्हा प्रतिनिधींनी केले “मराठी सन्मान यात्रे”चे स्वागत

Spread the love

 

महाड (रायगड) : रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पत्रकार नरेश पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमभागचे अध्यक्ष शुभम शेलके यांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक स्वागत केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.
पत्रकार नरेश पाटील हे “बेळगाव वार्ता”चे महाराष्ट्रातील रायगड जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. मूळचे बेळगाव शहरातील टिळकवाडी येथील रहिवासी असलेले नरेश पाटील पुढील कारकिर्दीसाठी रायगड जिल्ह्यात स्थायिक झाले. आज ते रायगड जिल्ह्यातील अग्रगण्य व विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे ते रायगड जिल्ह्यातील एखाद्या तालुका, विभाग किंवा क्षेत्रापुरते मर्यादित न राहता संपूर्ण जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे पत्रकार आहेत.
“मराठी सन्मान यात्रे”चे रायगड जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर “बेळगाव वार्ता”चे संपादक श्री. सुहास हुद्दार यांनी या कार्यक्रमाचे वार्तांकन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार रायगड जिल्ह्यात प्रत्यक्ष उपस्थित राहून पत्रकार नरेश पाटील यांनी या कार्यक्रमाचे सखोल वार्तांकन केले.
ही “मराठी सन्मान यात्रा” महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली पार पडत आहे.
महाराष्ट्र एकीकरण समिती ही बेळगाव सीमाभागातील मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी सातत्याने लढणारी संघटना आहे.
रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी झालेला हा स्वागत सोहळा मराठी अस्मिता, एकजूट आणि सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक ठरला असून, अशा चळवळी समाजापर्यंत पोहोचविण्यात जबाबदार पत्रकारितेची भूमिका अधोरेखित झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *