देसूर : आपल्या मातीतील कर्तबगार सुपुत्राने भारतीय सैन्यात दैदिप्यमान कामगिरी करत गावाचे नाव उंचावले आहे. देसूर गावचे रहिवासी जोतिबा गणपती पाटील यांची भारतीय सैन्य दलात ‘ऑनरी लेफ्टनंट’ (Honorary Lieutenant) या अत्यंत मानाच्या पदी निवड झाली आहे.
जोतिबा पाटील यांनी भारतीय सैन्यात प्रदीर्घ काळ सेवा बजावली असून, त्यांच्या शिस्तबद्ध आणि प्रामाणिक सेवेची दखल घेऊन त्यांना हा सन्मान बहाल करण्यात आला आहे. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना सैन्यातील एका जवानाला मिळणारा हा सर्वोच्च सन्मानांपैकी एक मानला जातो. या पदोन्नतीमुळे त्यांना आता भारतीय सैन्यात ‘कमिशन ऑफिसर’चा दर्जा प्राप्त झाला आहे.
त्यांच्या या यशाबद्दल देसूर परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सामान्य कुटुंबातून येऊन, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी मिळवलेले हे यश गावातील तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta