बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे रविवार दि. 1 फेब्रुवारी रोजी वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
रेल्वे ओव्हरब्रिज जवळील तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन (ओरिएंटल हायस्कूल) येथे सकाळी साडे दहा वाजता या मेळाव्याला प्रारंभ होणार आहे.
कोल्हापूर, पुणे, गोवा, धारवाड, बेंगलोर व बेळगाव तसेच आसपासच्या भागातील इच्छुक वधूवराची या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थिती असते तरी समाज बांधवांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta