बेळगाव : बेळगाव शहरातील न्यू गुडशेड रोड, ५ वा क्रॉस परिसरातील श्री गणेश मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले असून आता मंदिरात नवीन श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, मूळक व उत्सवमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
यासाठी रविवार दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ठीक ३ वाजता भव्य श्री गणेश आगमन मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. ही मिरवणूक छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यान, शाहापूर येथून सुरू होऊन विविध मार्गांनी मंदिरात येणार आहे.
तसेच गुरुवार दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी आणि शुक्रवार दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी नवग्रह, वास्तुपूजा, श्री गणेश प्राणप्रतिष्ठा, गणहोम व दुपारी १२ वाजता महाआरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सर्व धार्मिक कार्यक्रमांमध्ये परिसरातील सर्व गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन श्रीकृपेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त श्री गणेश सेवा अभिवृद्धी संघ, न्यू गुडशेड रोड, बेळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta