Sunday , July 26 2026
Breaking News

हिमांशू पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त निपाणीत रविवारी नेत्र तपासणी, रक्तदान शिबिराचे आयोजन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : येथील दौलत मळा मधील रहिवासी हिमांशू पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त रविवारी आंदोलन नगरातील स्वामी समर्थ मंदिरात पूजा अभिषेक, मोफत नेत्र तपासणी शिबिर, उपनलिका खोदाई, रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये शहर आणि परिसरातील नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष संयोजित उर्फ निकु पाटील यांनी केले आहे. शुक्रवारी (ता.३०) दुपारी आयोजित बैठकीत ते बोलत होते. दौलतराव पाटील मळा ग्रुप, निकु पाटील मित्रपरिवार, दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
निकु पाटील म्हणाले, पारंपरिक कार्यक्रमाला फाटा देऊन समाजाला नवी दिशा देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी आंदोलनगरातील स्वामी समर्थ मंदिरात अभिषेक पूजा व दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी नऊ वाजता प्रभाग क्रमांक २४ मधील नागरिकांची पाण्याची अडचण लक्षात माजी उपनगराध्यक्ष झाकीर कादरी यांच्या संकल्पनेतून कुपनलिकेची खोदाई करण्यात येणार आहे. याशिवाय अक्कोळ रोडवरील राजा शिवछत्रपती संस्कृती भवनात डॉ. अग्रवाल हॉस्पिटल तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर होणार आहे. शिबिरात मोफत नेत्र तपासणी करून चष्म्याचा नंबर दिला जाणार आहे. अंकुरम ब्लड बँकेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्त त्यांना हेल्मेट भेट म्हणून देण्यात येणार आहे. याशिवाय येथील महात्मा गांधी रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप केले जाणार आहे. तरी या उपक्रमाचा परिसरातील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
बैठकीस माजी उपनगराध्यक्ष झाकीर कादरी, राजू पाटील, रमेश भोईटे, इंद्रजीत माडेकर, कृष्णात कुंभार, विनोद बल्लारी, सागर पाटील, संदीप इंगवले, स्वप्निल उर्फ छोटू पावले, अनिल श्रीखंडे, लोकेश घस्ते यांच्यासह दौलतराव पाटील सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *