Sunday , July 26 2026
Breaking News

सर्वदा सोसायटीच्या वतीने अजित पवारांना आदरांजली

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचे 28 जानेवारी रोजी विमान अपघातात दुःखद निधन झाले या निधनामुळे सीमाभागासह सहकार क्षेत्रावरही मोठा दुःखाचा डोंगर कोसळला.

यासाठी अजितदादा पवार यांना गोंधळी गल्लीतील सर्वदा मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष सचिन पुरोहित यांच्या हस्ते फोटोचे पूजन व पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले, यावेळी उपाध्यक्ष धनंजय पाटील यांनी अजित दादा यांच्या कार्याचा आढावा घेतला त्याचबरोबर इतर संचालक व कर्मचाऱ्यांच्या हस्ते पुष्पांजली वाहून अजित दादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी संस्थेचे संचालक श्री. बाबू पावशे, श्रीनाथ बेळवडी, चंद्रकांत मेलगे, संचालिका रूपा साखरे, शीतल शंभूचे, सेक्रेटरी मोहन कोचेरी, कर्मचारी संतोष लासे, रुपाली खांडेकर,भरमा बेळगावकर आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *