Tuesday , March 3 2026
Breaking News

उद्या श्री समादेवी पालखी सोहळा, रविवारी महाप्रसाद

Spread the love

 

बेळगाव : समादेवी गल्ली बेळगाव येथील श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना व वैश्यवाणी महिला मंडळातर्फे आज गुरुवारी श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सव सोहळाचा उद्या शनिवार दि. ३१ रोजी मुख्य दिवस असून सायंकाळी श्रीच्या पालखीने प्रदक्षिणा होणार आहे. रविवार दि. १ रोजी सकाळी ६-३० ते ११ वाजेपर्यंत नव चंडिका होम आणि दुपारी उद्या १२ वाजल्या पासून दुपारी ३ पर्यंत महाप्रसादाने उत्सवाची सांगता होणार आहे. उद्या शनिवारी सकाळी ६ ते ७ वाजता चौघडा व काकड आरती, सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत श्री समादेवी मूर्तीला महाभिषेक, दुपारी १२ श्रीला मिष्टान्न व महानैवेद्य, दुपारी २ वाजल्यापासून श्री समादेवी ला ओटी भरण्यास प्रारंभ, दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत पुराण वाचन सायंकाळी ४ ते ८ वाजेपर्यंत श्री समादेवीची पालखी प्रदक्षिणा, त्यानंतर पाचवी प्रदक्षिणा समादेवी गल्ली, गोंधळी गल्ली, गवळी गल्ली, नार्वेकर गल्ली आणि श्री समाधी मंदिरा जवळ सांगता होईल. रात्री ८-१५ वाजता सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर सावंतवाडी तर चंदगड नगरपंचायत नगराध्यक्ष आणि श्री संस्थान शांताश्रम वैश्य कुलुगुरुमठ हळदीपूरचे माजी अध्यक्ष सुनील खानेकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. याप्रसंगी पालखी सोहळा नंतर श्रीच्या देवी समोरील चांदीचे नाणे व श्रीफळे यांचा पावणी कार्यक्रम होणार आहे. या दोन दिवस होणाऱ्या कार्यक्रमाला भक्तानी व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष महादेव गावडे, सचिव विनायक शहापूरकर, वैश्य समाज महिला मंडळ अध्यक्षा वर्षा सटवानी, सचिव मंजुषा देवलापूरकर आणि वैश्य युवा संघटना अध्यक्ष प्रवीण पिळणकर सचिव रुपेश बापशेट यांनी केले आहे.
शुक्रवारी उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी लक्ष पुष्पार्चन करण्यात आले. दुपारी 2 ते सायंकाळी 7 पर्यंत विविध भजनी मंडळाचे भजनांचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर पावणी कार्यक्रम पार पडला. यावेळी श्रीदेवीला नवरात्र मध्ये नेसवण्यात आलेल्या साड्या, खन यांचा जाहीर रीतीने जास्तीत जास्त मागणी करणाऱ्या भक्तांना प्रसाद म्हणून देण्यात आले. यावेळी वैश्यवाणी समाज बंधू-भगिनी तसेच भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *