Tuesday , March 3 2026
Breaking News

सीमाप्रश्नाचा तारणहार हरपला : अजितदादांना येळ्ळूरवासियांची भावपूर्ण श्रद्धांजली

Spread the love

 

येळ्ळूर : अजितदादांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्राबरोबर संपूर्ण देश हादरला. सहकार, कृषी आणि जलसिंचन क्षेत्रात नवनवीन योजना राबवून विकासात्मक दृष्टिकोनातून विचार करणारा आणि सीमाप्रश्नाची जाण असणारा अष्टपैलू नेता आमच्यातून गेला. मराठी भाषिकांनी एकजूट राहून मराठी भाषेचे संवर्धन केल्यास अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत येळ्ळूर येथे आयोजित केलेल्या सर्व पक्षीय शोकसभेत व्यक्त करण्यात आले. शोकसभेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एकीकरण समितीचे ए.पी.एम.सी. सदस्य वामनराव पाटील हे होते.
प्रारंभी वामनराव पाटील आणि लक्ष्मी मासेकर यांनी अजितदादांच्या फोटोचे पूजन केले. त्यानंतर दोन मिनिटे मौन पाळण्यात आले.
सुरूवातीस प्रकाश अष्टेकर यांनी प्रास्ताविकात अजिदादानी सीमाभागातील मराठी संस्थांना आर्थिक मदत मिळावी म्हणून अर्थसंकल्पात तरतूद केली. त्याचबरोबर सीमाप्रश्नाकडे त्यांचे विशेष लक्ष होते, असे सांगितले.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते दत्ता उघाडे यांनी दादांच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकला. काँग्रेस पक्षाच्या वतीने श्रद्धांजली वाहताना आण्णा हणमंत पाटील यांनी सीमाप्रश्नासाठी एकदिलाने कार्य केले पाहिजेत, असे सांगितले.
भाजपचे अरविंद पाटील यांनी, अजितदादा एक शिस्तप्रिय नेते होते. सकाळी सहा वाजल्यापासून आपल्या कार्यात मग्न रहात असत, असे सांगून श्रद्धांजली वाहिली. समाज सारथी सेवा संघाचे अध्यक्ष सी. एम. गोरल यांनी दादा म्हणजे दिलखुलास व्यक्तिमत्व होते. दिलदार आणि दमदार नेत्याला आम्ही पोरके झाल्याचे सांगितले. येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्षा यांनी ग्राम पंचायतीच्यावतीने श्रद्धांजली वाहिली.
या शोकसभेत दुद्दापा बागेवाडी, राजू पावले आदिनी श्रद्धांजलीपर आले विचार मांडले.
शेवटी अध्यक्षीय भाषणात वामनराव पाटील यांनी पवार कुटुंबियांच्या दु:खात येळ्ळूर सहभागी असल्याचे सांगितले.
या सर्वपक्षीय शोकसभेला माजी तालुका पंचायत सदस्य चांगदेव परीट, नवहिंद सोसायटीचे चेअरमन शिवाजीराव सायनेकर, ब्रम्हलिंग सोसायटीचे नेताजी गोरल, स्वामी विवेकानंद सोसायटीचे प्रकाश पाटील, डाॅ. तानाजी पावले, ग्रामपंचायत सदस्य दयानंद उघाडे, राकेश परीट, पिंटू चौगुले, विलास बेडरे, सतिश देसूरकर, शशिकांत धुळजी, कल्लापा मेलगे, अनुसया परीट, श्रीमती रेणुका रमेश मेलगे, नारायण काकतकर, लक्ष्मण बेकवाडकर, सूरज गोरल, यलाप्पा आ. पाटील, संजय गोरल, हणमंत पाटील, बळीराम देसूरकर,, मेलगे, सुभाष मजुकर, रमेश जयराम धामणेकर, कृष्णा बिजगरकर, कृष्णा शहापूरकर, नंदकुमार पाटील, शिवाजी कदम, मधुसूदन पाटील, प्रकाश मालुचे, आण्णा संभाजीचे आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *