Tuesday , March 3 2026
Breaking News

चंडिका होम आणि महाप्रसादाने श्री समादेवी जन्मोत्सवाची सांगता

Spread the love

 

बेळगाव : समादेवी गल्ली बेळगाव येथील श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना व वैश्यवाणी महिला मंडळातर्फे श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सव सोहळा निमित्त रविवार रोजी चंडिका होम व महाप्रसाद मोठ्या उत्साहात पार पडला. रविवार रोजी सकाळी ६-३० ते ११ वाजेपर्यंत नव चंडिका होम मोठ्या भक्तीभावाने करण्यात आला. यावेळी चंडिका होम करण्यासाठी पुरोहित रघुनाथ वागळे, दत्तात्रय भावे यांच्या मार्गदर्शनाखाली जयश्री व अभिषेक अरूण पठाणे आणि वैदेही व श्रेयस सतिश काडगे – जयसिंगपूर. यांचे हस्ते पूजा व चंडिका होम करण्यात आला. श्री समादेवी आणि चंडिका देवीला महाप्रसाद नैवेद्य दाखविल्यानंतर महाप्रसादाला प्रारंभ झाला. यावेळी हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. चंडिका होम आणि महाप्रसाद यशस्वी करण्यासाठी विश्वस्त सुरेश पिळणकर, सुधीर मदली, राकेश कलघटगी, अध्यक्ष महादेव गावडे, सचिव विनायक शहापूरकर, वैश्य महिला मंडळ वर्षा सटवाणी, सचिव मंजुषा देवलापूरकर, वैश्य युवा संघटना अध्यक्ष प्रवीण पिळणकर, सचिव रुपेश बापशेट, आणि कार्यकारी मंडळाच्या सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी झाला.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *