Tuesday , March 3 2026
Breaking News

ट्रॅक्टरवरील डीजेच्या धिंगाण्याविरोधात श्रीनिवास पाटील यांचे उपोषणास्त्र

Spread the love

 

बेळगाव : उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यांमध्ये ट्रॅक्टरला लावण्यात आलेल्या बेकायदेशीर डीजे साऊंड सिस्टीमने आता सर्वसामान्यांचा जीव धोक्यात आणला आहे. शालेय विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि रुग्णांच्या शांततेत व्यत्यय आणणाऱ्या या गोंगाटाविरोधात श्रीनिवास पाटील यांनी एल्गार पुकारला असून, प्रशासकीय दुर्लक्षामुळे त्यांनी उपोषण सुरू केले आहे.

बेळगाव, बागलकोट आणि विजापूरसह उत्तर कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांमध्ये ट्रॅक्टरवर बेकायदेशीरपणे बसवलेल्या डीजे साऊंड सिस्टीमचा धुमाकूळ वाढला आहे. यामुळे सार्वजनिक शांतता भंग पावत असून, विशेषतः शालेय मुले, महिला आणि वृद्धांच्या आरोग्यावर याचे गंभीर परिणाम होत आहेत. ध्वनी प्रदूषणामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असतानाच, रस्त्यांवरील प्रचंड आवाजामुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. या संदर्भात सह-परिवहन आयुक्तांना निवेदन देऊनही कोणतीही कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८०० हून अधिक लोकांनी रस्ते अपघातात आपला जीव गमावला आहे. ट्रॅक्टरचा हा कर्णकर्कश आवाजच या अपघातांना मुख्यत्वे कारणीभूत असून, परिवहन विभागाचे अधिकारी कारवाई न करून सरकारशी प्रतारणा करत आहेत, अशा शब्दांत श्रीनिवास पाटील यांनी टीका केली. कर्तव्यचुकार अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे आणि बेकायदेशीर स्पिकर्स पूर्णपणे जप्त करावेत, अशी मागणी श्रीनिवास पाटील यांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *