Tuesday , March 3 2026
Breaking News

चोरीसाठी वापरलेल्या तीन दुचाकी मलप्रभा नदीत सापडल्या!

Spread the love

 

बेळगाव : सौंदत्ती येथे दागिन्यांच्या दुकानात झालेल्या चोरी प्रकरणात वापरलेल्या तीन दुचाकी बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगलजवळील नयानगर येथील चोरीसाठी वापरलेल्या तीन दुचाकी मलप्रभा नदीत सापडल्या.

आज बुधवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एसपी रामराजन यांनी सांगितले की, बैलहोंगल पोलीस ठाण्याच्या व्याप्तीतील नयानगर येथील मलप्रभा ब्रिजवर आज सकाळी नेहमीप्रमाणे फिरावयास गेलेल्या मॉर्निंग वॉकर्सना मलप्रभा नदीत कांही मोटरसायकली संशयास्पदरित्या आढळून आल्या.

तेंव्हा त्यांनी त्याबाबत लागलीच पोलिसांना माहिती दिली. तेंव्हा बैलहोंगल पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन होंडा शाइन, अपाची व स्प्लेंडर प्लस अशा तीन मोटरसायकली ताब्यात घेतल्या आहेत. या जप्त केलेल्या मोटरसायकली सौंदत्ती येथे गेल्या डिसेंबर 2025 मध्ये घडलेल्या दुचाकी चोरी प्रकरणातील आहेत. त्याचप्रमाणे त्यानंतर यापूर्वी सौंदत्ती येथे त्याच तीन मोटरसायकली वापरून नऊ जणांनी एका दागिन्याच्या दुकानात चोरी केली होती. त्यानंतर चोरट्यांनी सौंदत्तीहून बैलहोंगलकडे जाताना पुरावा नष्ट करण्यासाठी त्या मोटरसायकली मलप्रभा नदीत फेकून दिल्या. आज त्या मोटरसायकली सापडल्या असून त्या जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच चोरट्यांचा तपास जारी असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले.

दरम्यान, बैलहोंगल तालुक्यातील नयानगरजवळील मलप्रभा नदीत तीन दुचाकी वाहने आढळून आल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही अज्ञात समाजकंटकांनी त्या तीन मोटरसायकली आणून नदीत फेकून दिल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मोटरसायकलिंबद्दल माहिती मिळताच सीपीआय प्रमोद यलिगार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

यावेळी समाजसेवक मल्लिकार्जुन गाणिगेर व त्यांच्या मित्रमंडळींनी नदीत उतरून सुमारे 2 तास मेहनत घेत नदीत बुडालेल्या तिन्ही दुचाकी बाहेर काढून काठावर आणल्या. पोलिसांनी पंचनामा करून त्या मोटरसायकली जप्त केल्या. यावेळी घटनास्थळी नदीकाठावर बघ्यांची गर्दी झाली होती.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *