Tuesday , March 3 2026
Breaking News

रोशनी मुळीक हिचा झाला सन्मान

Spread the love

 

बेळगाव : सिलिगुडी पश्चिम बंगाल येथे 31 जानेवारी रोजी झालेल्या बीएसएफ शपथ ग्रहण समारंभ संपन्न झाला त्यात मुळची खानापूर तालुक्यातील ओलमनी या गावची पण सध्या राहणार शाहूनगर कंग्राळी बी के गावची सुपुत्री कु. रोशनी वसंत मुळीक हिने 400 मुले आणि मुलीमध्ये परेड कंमांडर लीड करण्याचा बहुमान मिळविला होता..
तसेच तिला या शपतग्रहण समारंभात बेस्ट परेड कमांडर, बेस्ट ड्रिल पुरस्कार प्रदान करण्यात आले 400 मुलामुलीमध्ये तिने नारी शक्तीचा आवाज घुमविला या बद्दल तिला पुरस्कारही मिळाला होता. याचं औचित्य साधून मुळीक कुटुंबीयांनी रोशनी हीचा सत्कार समारंभ वसुंधरा मंगल कार्यालय शाहू नगर येथे आयोजित करण्यात आला होता. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके, खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, युवा।समिती सीमाभागचे सरचिटणीस मनोहर हुंदरे, कंग्राळी बी.के. ग्राम पंचायतीचे सदस्य जयराम पाटील, जोतिबा शहापुरकर, बाबू पावशे, रोशनीचे प्रशिक्षक प्रशांत शहापुरकर आदी उपस्थित होते.

रोशनीचे वडील वसंत मुळीक व आई वैष्णवी मुळीक व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रोशनीला शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला पै पाहुणे व परिसरातील अनेक महिला नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *