Tuesday , March 3 2026
Breaking News

तिर्थकुंडे येथे महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : मौजे तीर्थकुंडे तालुका खानापूर कौलापुरवाडा येथील श्री रामलिंग देवस्थान कमिटी तीर्थकुंडे यांच्यावतीने महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार तारीख 15 फेब्रुवारी काकड आरती, लिंगपूजा, अभिषेक, बसवांण्णा पूजा, तुळशी पूजा, ध्वजारोहण, हरिपाठ भजन, बालापोसना या विविध कार्यक्रमाचे सकाळी पहाटे 4 ते रात्री 12.00 वाजेपर्यंत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, तसेच सोमवार ता, 16 रोजी पहाटे 4 वाजता काकड आरती, सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सौ रुक्मिणी व हभप सिद्राम जांबोटी पुरस्कृत महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे, तसेच महाप्रसादाला लागणाऱ्या नवीन भांडी विद्यमान आमदार विठ्ठल हलगेकर यांनी रोख एक लाख 25 हजार रुपये देऊन महाशिवरात्री कमिटी तीर्थकुंडे आर्थिक सहाय्य केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *