Tuesday , March 3 2026
Breaking News

आयुष्यात एक दिवस अविस्मरणीय असावा यासाठीच वाढदिवस ज्येष्ठांसोबत साजरा : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

Spread the love

 

बेळगाव : ज्येष्ठ नागरिकांसमवेत वाढदिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे वडीलधाऱ्या मंडळींसोबत वेळ घालवणे व त्यांचा आशीर्वाद घेणे हा होता. ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात पुन्हा एकदा नवचैतन्य, उत्साह निर्माण व्हावा अशी आपली इच्छा होती. दैनंदिन जीवनातील समस्या दूर ठेवून त्यांच्या आयुष्यात एक दिवस अविस्मरणीय असावा यासाठी आपण आपला वाढदिवस ज्येष्ठांसोबत साजरा करण्याचा निर्णय घेतला, असे प्रतिपादन महिला बालकल्याण विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले.
आपल्या पन्नासाव्या वाढदिवसाप्रित्यर्थ त्या बोलत होत्या.
शनिवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी लक्ष्मी हेब्बाळकर यांचा वाढदिवस ज्येष्ठ नागरिकांस वैविध्यपूर्णरित्या साजरा करण्यात आला. या वाढदिवस समारंभाला ग्रामीण मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांना सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक म्हणजे समाजातील ज्ञान अनुभव आणि संस्कृतीचे जीवन भांडार आहेत, त्यामुळे प्रत्येकाने त्यांचा आदर करावा त्यांचे आशीर्वाद घ्यावे यासाठीच आपण आपला वाढदिवस ज्येष्ठांसोबत साजरा केला, असे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर मंत्री हेब्बाळकर यांच्या मातोश्री गिरीजा हट्टीहोळी, तरीहाळचे आडसिद्धेश्वरस्वामी, मैसूरचे निरंजन देवरू, युवा नेते मृणाल हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, युवराज कदम आदी उपस्थित होते.
वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या निवासस्थानासमोर कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांबरोबरच जिल्ह्यातील विविध भागातून मोठ्या संख्येने समर्थक आणि ग्रामस्थांची रिघ लागली होती. सामान्यता वाढदिवस हा केक कापून, भेटवस्तू शुभेच्छा देऊन साजरा केला जातो परंतु मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपला वाढदिवस आपल्या मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांसमवेत साजरा करून नवा आदर्श घालून दिला आहे. वाढदिवस वैयक्तिकरित्या किंवा राजकीय व्यक्तिंसमवेत साजरा करण्याऐवजी ज्येष्ठ नागरिकांना आपला वाढदिवस समर्पित करून त्यांनी समाज कल्याणकारी नेतृत्वाचे उदाहरण मांडले आहेत, असे विचार यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. या वाढदिवस कार्यक्रम दरम्यान ज्येष्ठ नागरिकांसाठी मनोरंजनात्मक खेळ आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर ज्येष्ठांशी संवाद साधून लक्ष्मी अक्का यांनी त्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या सायंकाळी संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *