Tuesday , March 3 2026
Breaking News

येळ्ळूर गावकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे चार मुले आईवडिलांकडे सुखरूप सुपूर्द

Spread the love

 

बेळगाव : पिरनवाडी गावातील शाळकरी मुले येळ्ळूर शिवारात फिरताना आढळली. सदर घटना मंगळवारी सायंकाळी घडली असून येळ्ळूर शिवारात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना सात ते आठ वर्षे वयोगटातील 4 मुले शेतात इकडे तिकडे फिरत असल्याचे निदर्शनास आली. अनोळखी मुले हातात आपल्या कपड्यांच्या पिशव्या घेऊन शेतात फिरतानाचे निदर्शनास येताच शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखत मुलांना ताब्यात घेऊन सदर घटनेची माहिती तात्काळ ग्रामस्थांना दिली.

उपलब्ध माहितीनुसार पिरनवाडी येथील एका गल्लीत ही मुले खेळत असताना एका दुचाकीस्वाराने फिरायला जाऊया असे सांगत मुलांना दुचाकीवरून आणले आणि येळ्ळूर येथील शेतात सोडून दिले त्यानंतर ही मुले शेतात इकडे तिकडे फिरत असताना आपल्या शेतात काम करणाऱ्या कार्लेकर बंधूंच्या लक्षात आले. त्यांनी त्या मुलांची चौकशी केली त्यावेळी मुलांनी आपली हकीकत कार्लेकर यांना सांगताच त्यांनी तात्काळ येळ्ळूर ग्रामपंचायतचे सदस्य सतीश पाटील यांच्याशी संपर्क साधून सदर घटनेची माहिती सांगितली असता सतीश पाटील यांनी याबाबत ग्रामीण पोलीस स्थानकात माहिती दिली. दरम्यान पिरनवाडी येथे मुलांचे आई-वडील आपल्या मुलांचा सर्वत्र शोध घेत होती. इतरत्र शोध घेऊन आपली मुले सापडली नाहीत म्हणून सदर पालकांनी ग्रामीण पोलीस स्थानक गाठले आणि आपली मुले बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांना उपलब्ध माहितीच्या आधारे शोध मोहीम राबवत येळ्ळूर येथील विठ्ठल रुक्माई मंदिर परिसरात रात्री साडेआठच्या दरम्यान सदर मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि मुलांची ओळख पटवून मुलांना त्यांच्या पालकांकडे सुपूर्द केले. या घटनेमुळे पिरनवाडीसह परिसरात एकच खळबळ माजली असून लहान मुलांना दुचाकीवरून येणारी अज्ञात व्यक्ती नेमकी कोण होती, त्या व्यक्तीचा उद्देश काय होता याचा तपास बेळगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *