Tuesday , March 3 2026
Breaking News

बिबट्या नव्हे तर ते “रानमांजर”

Spread the love

 

बेळगाव : बुधवारी संध्याकाळी शहरातील कॅम्प, लिंगराज कॉलेज परिसरात बिबट्या फिरत असल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली, ज्यामुळे कॅम्प परिसरात मोठी चिंता निर्माण झाली. तथापि, वन विभागाच्या कॅमेरा ट्रॅपने टिपलेल्या फुटेजच्या विश्लेषणातून हे स्पष्ट झाले आहे की तो बिबट्या नव्हे तर ‘रानमांजर’ असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, बुधवारी या परिसरात बिबट्या फिरत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र तो प्राणी बिबट्या नसून रानमांजर असल्याचा खुलासा वन विभागाने केला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

नागराज बाळेहोसूर (एसीएफ) यांनी सांगितले की, “व्हायरल व्हिडिओतील प्राणी हा बिबट्या नसून जंगली मांजर आहे. वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये त्याचे स्पष्ट फोटो मिळाले आहेत.” तसेच, आणखी दोन ते तीन दिवस सापळे तसेच ठेवण्यात येणार असून पुढील चार दिवस परिसरावर बारकाईने लक्ष ठेवले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वन विभाग पूर्णपणे सतर्क असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *