बेळगाव : मराठा मंडळ कॉलेज आँफ फार्मासी येथे आज दि. २१ रोजी सकाळी सदरचे व्याख्यान उत्साहात संपन्न झाले. हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू कंग्राळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी आपल्या मनोगतात संशोधनाची गरज आणि गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
या प्रसंगी प्रमुख वक्त्या म्हणून राणी चन्नमा कॉलेज आँफ फार्मासी च्या असोसिएट प्राध्यापक डॉ.निकिता कनबरकर यांनी व्याख्यान दिले. आपल्या प्रभावी सादरीकरणातून त्यांनी संशोधन पद्धतीची मूलतत्त्वे, साहित्य शोध, डेटा विश्लेषण, प्रकाशनातील नैतिकता तसेच वैज्ञानिक दस्तऐवजीकरण याविषयी सविस्तर माहिती दिली.
विद्यार्थी व प्राध्यापकांनी व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध प्रश्न विचारून शंका निरसन करून घेतले. संशोधन क्षेत्रात भक्कम पाया तयार करण्यासाठी हे व्याख्यान मार्गदर्शक ठरले.
हा कार्यक्रम आयक्यूएसी व फार्माकॉलॉजी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. समन्वयक म्हणून श्री. श्रीजित पाटील व हर्षदा कुसाणे यांनी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले. सूत्रसंचालन कुणाल सोलंकुरे यांनी केलं, आभारप्रदर्शन विनायक पत्तार यांनी केलं.
Belgaum Varta Belgaum Varta