Tuesday , March 3 2026
Breaking News

किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरी यांच्या सौजन्याने बाग परिवाराची काव्य मैफिल

Spread the love

 

बेळगाव : किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरी यांच्या सौजन्याने महात्मा फुले रोड येथील किसना डायमंड अँड ज्वेलरी शोरूम येथे बाग परिवाराच्या काव्य मैफिलीचे नियोजन करण्यात आले होते. किसना शोरूम चे संचालक श्री विनायक जाधव तसेच श्री. प्रमोद भुकटे यांनी एक अनोखा उपक्रम म्हणून बाग परिवाराला काव्यमैफलीसाठी निमंत्रित केले होते. कार्यक्रमाची सुरुवात डाॅ. प्रा मनिषा यांच्या सरस्वती वंदनेने तसेच सिद्धी जाधव यांनी रोपट्याला पाणी घालून केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरती शहा यांनी केले. या काव्य मैफिलीत 25 कवींनी सहभाग घेतला होता. अपर्णा पाटील, अस्मिता आळतेकर, डॉ. प्रा. मनीषा नाडगौडा, डॉ. प्रेमा मेणशी, प्रतिभा सडेकर, अक्षता येळ्ळूरकर, स्मिता पाटील, डाॅ.संजीवनी खंडागळे, स्नेहल बर्डे, धनश्री देसाई, अशोक सुतार, आनंद मेणशी, ज्योतिबा नागवडेकर, पूजा सुतार, प्रा. शुभदा प्रभू खानोलकर, विजयश्री चव्हाण, कोमल खांडेकर, चंद्रशेखर गायकवाड, मनीषा मोरे आदींनी आपल्या दर्जेदार कविता काव्य मैफिलीत सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशनी हुंद्रे यांनी केले. आरती शहा यांनी या कार्यक्रमाचे सुंदर असे नियोजन करून आभार मानले. कार्यक्रमासाठी प्रेक्षक वर्ग प्रा. अवधूत खानोलकर, सुधा माणगावकर आदी तसेच किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरी शोरूमचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते एकंदरीत ही काव्यमैफिल कवितांच्या शब्द कुसुमांनी छानच रंगली.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *