खानापूर (प्रतिनिधी) : बिडी (ता.खानापर) येथे जागतीक पर्यावरणाचे औचित्य साधुन तसेच ४० झाडाची लावड करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
यावेळी बोलताना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी म्हणाले की, पृथ्वी तलावर ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात हवा असेल तर प्रत्येकाने प्रत्येक वर्षी एक झाड लावून ते जगविले पाहिजे नाही तर ऑक्सिजन विकत घेऊन जीवन जगणे कठीण होणार आहे. याची प्रचिती नुकताच कोरोनाच्या महामारीमुळे स्पष्ट झाले. तेव्हा झाडे लावा, झाडे जगवा तरच ऑक्सिजन जगण्यासाठी मिळेल. असे सांगितले.
कार्यक्रमाला खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका पंचायत बसवराज सानिकोप, संजय कंची, युवा मोर्चा अध्यक्ष पदाधिकारी, भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी प्रमोद कोचेरी यांच्याहस्ते वृक्ष रोपण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta