Saturday , July 27 2024
Breaking News

भाजपनं पक्ष म्हणून किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाहीत : चंद्रकांत पाटील

Spread the love

कोल्हापूर : भाजप स्वतः आंदोलन करणार नाही, मात्र मराठा आरक्षणासाठी भाजपचा पाठिंबा आहे. ही आमची स्पष्ट भूमिका आहे. असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं आहे. त्याचप्रमाणं भाजपानं पक्ष म्हणून किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाहीत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच केला गेलेला सन्मान हा बहुदा इतरांना माहित नाही, असं वक्तव्यही त्यांनी केलं आहे.

मराठा समाजाने आज रस्त्यावर उतरुन संघर्ष नाही केला, तर वेळ निघून जाईल. त्यामुळे कोणताही झेडा, बॅच न घेऊन भाजपा आंदोलनात सहभागी होणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. तसेच मराठा आरक्षणासाठी भाजपचा पूर्ण पाठिंबा आहे, तर हिच आमची स्पष्ट भूमिका आहे, असंही ते म्हणाले. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटलांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भाजपा नेते आणि खासदार संभाजीराजे यांच्या भूमिकेबद्दलही मत व्यक्त केलं आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, “भाजपनं पक्ष म्हणून किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाहीत. त्यांचा केलेला सन्मान आणि किती कामे मार्गी लावली हा बहुदा इतरांना माहित नाहीत.”

खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणप्रश्नी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदींकडे चार वेळेस पत्र लिहून भेट मागितली होती. पण मोंदींनी भेट नाकारली असं माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. याविषयी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “संभाजीराजेंनी 4 वेळा भेट मागण्याच्या आधी 40 वेळा मोदींजींसोबत त्यांची भेट झाली आहे. राजे भेट मागतात मोदीजी भेट द्यायचे. पण त्यानंतर 4 वेळा भेट नाकारण्याचं कारण कोविड पराकोटीला गेला आहे आणि ज्यासाठी ते भेट मागत आहे, तो विषय केंद्राचा नाही, राज्याचा आहे.”

चंद्रकांत पाटील बोलताना म्हणाले की, “अहमदाबादमध्ये खासदार संभाजीराजे छत्रपतींच्या सन्मानार्थ मोदींसह सर्वजण उभे राहीले. एवढच नाही तर शाहुंच्या वंशजांना पक्ष कार्यालयात यावं लागू नये म्हणून राष्ट्रपती कोट्यातून खासदार केलं. तसेच त्यांना पक्ष कार्यालयात बोलावू नका.” अशा सूचनाही पंतप्रधान मोदींनी दिल्या असल्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं. तसेच पुढे बोलताना, “संभाजीराजे व्यक्ती म्हणून काय करतात त्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे. आमच्याकडून त्यांच्याबद्दल अपशब्द निघणार नाही एवढंच नाही तर नेतृत्व करणाऱ्यासोबत पक्ष झेंडा बाजूला ठेऊन आम्ही सहभागी होणार आहोत.”

दरम्यान, सध्या संभाजीराजे छत्रपती हे मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यातील अनेक भागांचे दौरे करत आहेत. अनेकांच्या भेटीगाठी करत आहेत. यापूर्वी एकदा बोलताना मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर मी खासदारकीही सोडायला तयार असं संभाजीराजे म्हणाले होते. तेव्हापासून भाजप आणि खासदार संभाजीराजे यांच्या मतभेद सुरु असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला आहे.

जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. मुक्ताईनगर नगरपंचायतीतील सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा या निवासस्थानी हा पक्ष प्रवेश पार पडला. अशातच आता भाजपानं शिवसेनेला धक्का दिला आहे. माथेरान नगरपंचायतीतील शिवसेनेच्या 14 पैकी 10 नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. कोल्हापुरात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते.

About Belgaum Varta

Check Also

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Spread the love  नवी दिल्ली : कथित मद्य घोटाळाप्रकरणात ईडीने कारवाई करून अटक केलेले दिल्लीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *