Monday , December 15 2025
Breaking News

खानापूर

खानापूर मतदारसंघात बंडखोरीचे सावट!

  खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्याच्या सन २०२३ सालच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आणि खानापूर मतदारसंघातून सर्वच पक्षातील उमेदवार बंडखोरीचे अस्त्र उभारण्याचे लक्षणं यंदाच्या निवडणुकीत दिसुन येत आहे. तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचे सर्व प्रथम नाव जाहीर झाले. तसे अंजली निंबाळकर यांनी प्रचाराला प्रारंभ केला. मात्र काँग्रेस युवा नेते इरफान …

Read More »

खानापूर काँग्रेस पक्षात बंडखोरी; इरफान तालिकोटी निवडणूक रिंगणात

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर मतदारसंघात काँग्रेस पक्षाने स्थानिक उमेदवाराचा विचार केला नाही. गेली कित्येक वर्षे काँग्रेस पक्षात कार्य केलेल्या ज्येष्ठ नेत्यांना डावलून मागील २०१८ सालच्या विधानसभा निवडणुकीत अंजली निंबाळकर यांना उमेदवारी दिली. मात्र २०२३ सालच्या निवडणुकीत स्थानिक व एकनिष्ठ राहिलेल्या नेत्याला उमेदवारी देऊ शकले नाही. वरिष्ठ काँग्रेस पक्षाच्या नेत्यांशी चर्चा …

Read More »

खानापूर मतदारसंघातून आम आदमी पक्षाचा उमेदवार विधानसभा निवडणुक लढवणार

  खानापूर (प्रतिनिधी) : येत्या १० मे रोजी होणाऱ्या कर्नाटक राज्य विधानसभा निवडणुकीसाठी खानापूर मतदारसंघातून खानापूर तालुक्यातुन आम आदमी राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची माहिती खानापूर तालुका आम आदमी पक्षाचे सचीव शिवाजी गुंजीकर यांनी पक्षाच्या कार्यालयात बोलविलेल्या बैठकीत दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, खानापूर मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, …

Read More »

खानापूरात २२ मे रोजी पारंपरिक पद्धतीने चित्ररथ शिवजयंती मिरवणूक

  खानापूर (प्रतिनिधी) : यंदा २२ एप्रिल रोजी होणाऱ्या शिवजयंतीला पारंपरिक पद्धतीने चित्ररथ मिरवणुकीला निवडणूक आचारसंहिता लागू होत असल्याने यंदाच्या शिवजयंतीला आचारसंहितेमुळे मर्यादा येणार आहेत. त्यामुळे खानापूरातील चित्ररथ मिरवणुकीला सोमवारी दि. २२ मे ही तारीख सोयीची होणार आहे, असे मत युवा नेते पंडित ओगले यांनी मंगळवारी दि. ११ एप्रिल रोजी …

Read More »

खानापूरात जनता पार्टी कर्नाटक पक्षाचे उमेदवार शंकर कुरूमकर

  खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्य विधानसभा निवडणुकीत खानापूर मतदारसंघातून जनता पार्टी कर्नाटक पक्षातून गंगवाळी (ता. खानापूर) गावचे सुपुत्र शंकर कुरूमकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याची माहिती पक्षाचे प्रधान कार्यदर्शी नागेश यांनी खानापूरात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना उमेदवार शंकर कुरूमकर म्हणाले की, खानापूर तालुक्यात इतर पक्षा प्रमाणेच जनता …

Read More »

मुरलीधर पाटील खानापूर समितीचे अधिकृत उमेदवार

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची अधिकृत उमेदवारी विकास बँकेचे विकास बँकेचे चेअरमन अध्यक्ष मुरलीधर गणपतराव पाटील यांना घोषित करण्यात आली आहे . शनिवारी येथील म. ए. समिती संपर्क कार्यालयात 62 सदस्यांच्या निवड कमिटीची बैठक झाली. व मतदान यंत्रणेद्वारे निवड करण्याचा निकष ठरवण्यात आला. खानापूर तालुका म. ए. …

Read More »

खानापूरात अधिकाऱ्यांची दादागिरी; समिती कार्यालयासमोरील नामफलक काढला

  खानापूर : आचारसंहिता लागल्यापासून निवडणूक आयोगाने अनेक कडक निर्बंध घालून प्रचार अथवा बॅनरबाजीवर करडी नजर ठेवली आहे. खानापूरातील समिती संपर्क कार्यालयाचे नामफलकावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी फलक सक्तीने काढला आहे. नगरपंचायतीची रीतसर परवानगी घेऊन संपर्क कार्यालयाचा फलक लावला असताना हा फलक अवैध कसा असू शकतो असा जाब समिती …

Read More »

खानापूर नगरपंचायतीचा अनागोंदी कारभार; अपूर्व पाणी पुरवठा

खानापूर : नगरपंचायतीत अनागोंदी कारभार चालू आहे. नेहमी या- ना त्या कारणावरून चर्चेत असलेली नगरपंचायत शहराला पाणीपुरवठा करण्यात कुचकामी ठरलेली आहे. नगरपंचायतीच्या उंबरठ्यावर असलेल्या शाहूनगर (डोंबारी वसाहत) परिसरात अनियमित पाणीपुरवठा होत असल्यामुळे तेथील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. वारंवार मागणी करून देखील संबंधित नगरसेवक व नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांचे …

Read More »

इच्छुकांचे अर्ज समितीकडे दाखल!

  बेळगाव : गेल्या दोन निवडणुकीत पराभवाचा सामना करत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीने आगामी विधानसभा निवडणुकीत योग्य रणनीती ठरवून मराठी भाषिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार घेतला आहे. आतापर्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून निवडणुकीच्या दिशेने सुरु असलेली वाटचाल उमेदवार निवडीच्या टप्प्यावर येऊन ठेपली आहे. बेळगाव दक्षिण, बेळगाव …

Read More »

आबासाहेब दळवींचा अर्ज खानापूर समितीकडे दाखल

  खानापूर : विधानसभा निवडणुकीसाठी खानापूर मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणारे आबासाहेब दळवी यांनी आज खानापूर विभाग समिती निवड समितीकडे आपला विनंती अर्ज सादर केला आहे. यावेळी शिवाजी पाटील (मणतुर्गे), अरुण देसाई (नेरसे), ईश्वर बोबाटे (मणतुर्गे), बाळासाहेब शेलार (मणतुर्गे), राजाराम देसाई (हलशीवाडी), खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे, …

Read More »