Sunday , December 14 2025
Breaking News

खानापूर

बिडी ते पारिश्वाड रस्त्यावरील कोसळलेल्या ब्रिजचा आराखडा खानापूर भाजपाकडून सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना सादर

  खानापूर (तानाजी गोरल) : बिडी ते पारिश्वाड रस्त्यावरील कोसळलेल्या ब्रिजचा आराखडा सार्वजनिक बांधकाम मंत्री सी. सी. पाटील यांना भाजपच्या शिष्टमंडळाने सादर केला. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रमोद कोचेरी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे पदाधिकारी व नेते मंडळींनी कर्नाटक राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री श्री. सी. सी. पाटील यांची बेंगलोर येथे त्यांच्या …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

  खानापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त आज खानापूर येथे भाजप तक्रार निवारण केंद्राच्या कार्यकर्त्यांसह डॉ. सोनाली सरनोबत (भाजप महिला मोर्चा ग्रामीण उपाध्यक्ष) यांनी फळ व फुलांच्या रोपांची लागवड केली. मोदीजींनी केलेल्या योजना आणि अनेक विकास प्रकल्पांची माहिती यावेळी सोनाली सरनोबत त्यांनी दिली. भारतमाता व छत्रपती शिवाजी …

Read More »

खानापूर तालुका भाजपने घेतली धर्मादाय हज व वक्फ मंत्री जोल्ले यांची भेट

  खानापूर : भारतीय जनता पार्टी खानापूर यांच्या शिष्टमंडळाने बेंगलोर येथे धर्मादाय हज व वक्फ मंत्री सौ. शशिकला जोल्ले यांची भेट घेऊन खानापूर तालुक्यामधील रवळनाथ मंदिर खानापूर, निटुर, लोंढा, पारिशवाड, भांबार्डा, चिक्कदिनकोप, मंग्यानकोप, कोडचवाड, आमटे, बैलूर या 10 गावातील देवस्थानाला समुदाय भवनाची मागणी केली. मंत्र्यांनी या सर्व 10 गावातील समुदाय …

Read More »

कणकुंबी चेकपोस्टवर 450 लिटर गोवा बनावटीची दारू जप्त

  खानापूर : स्थानिक उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी गोव्यातून कर्नाटकात येणाऱ्या मालवाहू वाहनाला तालुक्यातील कणकुंबीजवळील उत्पादन शुल्क चेकपोस्टवर थांबवून तपासणी केली असता त्यात गोवा राज्यातील 450 लिटर दारू अवैधरित्या गोव्यातून कर्नाटकात आणली जात असल्याचे आढळून आल्याने कारवाई करण्यात आली. तपासणी दरम्यान, बेंगळुरू शहरात नोंदणी केलेल्या लाल रंगाच्या स्वराज मझदा वाहनात गोवा …

Read More »

तब्बल आठ महिन्यानंतर खानापूर तालुका पंचायतीला मिळाला ईओ अधिकारी!

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका हा अतिमागासलेला व दुर्गम तालुका म्हणून सर्वाना परिचित आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यात नेहमीच अनेक समस्या भेडसावत असतात. अशा समस्यानी ग्रस्त असलेल्या खानापूर तालुक्याला गेल्या आठ महिन्यापासून तालुका पंचायत कार्यनिर्वाह अधिकारी (एईओ) पद रिक्त होते. त्यामुळे तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. …

Read More »

शिप्पूर ते हडलगा रस्त्यावर खड्डेच खड्डे

  खानापूर : शिप्पूर ते हडलगा रस्त्यावर पावसामुळे खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून दुचाकीस्वारांना खड्डे चुकवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्डे चुकवण्याच्या नादात वारंवार अपघात होत असून गंभीर जखमा झाल्याच्या घटना घडत आहेत. नांगनुर बस स्टॉपसमोर धोकादायक भली मोठी चर पडली असून तिथं वारंवार अपघात घडत आहेत. तसेच बुगटे …

Read More »

अतिवृष्टीमुळे घर कोसळलेल्या महिलेला नुकसान भरपाई मिळवून द्यावी

  खानापूर : अतिवृष्टीमुळे सन्नहोसुर ता. खानापूर येथील रेणुका तातोबा पाटील यांचे राहते घर कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पण अद्याप या महिलेला कोणतीही नुकसानभरपाई मिळालेली नाही. तरी स्थानिक आमदारांनी सदर महिलेला योग्य ती नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी केली जात आहे. तोपीनकट्टी ग्रामपंचायत हद्दीतील सन्नहोसूर येथील रेणुका …

Read More »

खानापूरात पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

  खानापूर (प्रतिनिधी) : आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत पंधरवडा दिन पाळण्यात येणार असून या पंधरा दिवसांत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये क्षयरोगाचे निर्मूलनासाठी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. पाणी आडवा पाणी जिरवा, रक्तदान, झाडे लावा झाडे जगवा आदी कार्यक्रम …

Read More »

ओलमणी हायस्कूलमध्ये सत्कार सोहळा संपन्न

खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणीचे मुख्याध्यापक सी. एस. कदम यांना मिळाला. याबद्दल तसेच गावातील पहिला एम.डी. पदवी प्राप्त शाळेचा माजी विद्यार्थी डॉक्टर सुरज मारुती साबळे यांचा आणि हायस्कूलच्या मुलींच्या खो-खो संघाने व …

Read More »

पारिश्वाड – बिडी दरम्यानच्या मलप्रभा नदीवरील ब्रीजची भाजपा नेत्यांकडून पहाणी

  खानापूर (तानाजी गोरल) : पारिश्वाड ते बिडी रस्त्यावरील मलप्रभा नदीवर बांधण्यात आलेले ब्रीज मोडकळीला आलेले असून कोणत्याही क्षणी आणि केव्हाही कोसळून पडण्याची स्थिती निर्माण आहे. याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी भाजपाचे नेते व जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी केली आहे. यासंबंधी त्यांनी बेळगावचे मुख्य एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि खानापूर पीडब्ल्यूडीचे …

Read More »