खानापूर (प्रतिनिधी) : झाड अंकले (ता. खानापूर) येथील सरकारी लोअर प्राथमिक मराठी शाळेच्या एसडीएमसी कमिटीच्या अध्यक्षपदी उमेश म्हात्रे धबाले तर उपाध्यक्षपदी सातेरी ओमाणी गुंजीकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर एसडीएमसी कमिटीच्या सदस्यपदी 18 जणांची निवड करण्यात आली. सदस्य पदी यल्लापा देवलतकर, नागेश धबाले, मोहन देवलतकर, सोमनाथ मोटर, सुरेश …
Read More »तोपिनकट्टीत माऊली यात्रेला प्रारंभ
खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथे दर तीन वर्षातून एकदा होणार्या माऊली देवीच्या यात्रेला शुक्रवारी दि. 19 ऑगस्टपासून प्रारंभ झाला आहे. मंगळवारी दि. 23 रोजी यात्रेची सांगता होणार आहे. यात्रेचा प्रारंभ शुक्रवारी दि. 19 रोजी झाला. यावेळी सकाळी 10.30 वाजता गार्हाणे घालून गावची सीम बांधण्यात आली. या पाच दिवसांत …
Read More »चापगाव येथे गोकुळाष्टमी उत्साहात साजरी
खानापूर : चापगाव येथे गोकुळाष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. चापगाव येथील भजनी मंडळ व ग्रामस्थांनी मिळून रात्रभर भजन व किर्तनाचा कार्यक्रम सादर केला आला. त्यानंतर महाकाला पार पडला. त्यानंतर श्रीकृष्णाच्या मूर्तीची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली व कृष्णमंदिराचा दहावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश धाबाले यांनी केले. …
Read More »खानापूर, बेळगावच्या श्रीकृष्ण हणबर गवळी समाजाचा पुण्यात वार्षिक स्नेहमेळावा संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर, बेळगाव भागातील श्रीकृष्ण हणबर गवळी समाज पुण्यात स्थायिक असून या श्रीकृष्ण हणबर गवळी समाजातील बांधवांचा पुण्यातील वारजे माळवाडी येथील कम्युनिटी हॉलमध्ये वार्षिक स्नेह मेळाव्याचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्या डी. आर. करणुरे सर व सौ. करणुरे, श्रीमती नंदा पाटील, समाजाचे …
Read More »खानापूरात अंगणवाडी कर्मचार्यांचा विविध मागण्यांसाठी मोर्चाद्वारे तहसीलदाराना निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील अंगणवाडी शिक्षिका व सहाय्यिका यांच्यावतीने आपल्या विविध मागण्यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. यावेळी अंगणवाडी शिक्षिका व सहाय्यिकाचा मोर्चा शिवस्मारक चौकातून तहसील कार्यालयावर काढण्यात आला. यावेळी अंगणवाडी संघटनेच्या मेघा मिठारी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, अंगणवाडीच्या शिक्षिका व …
Read More »लैला शुगर्सकडून दुसरा हप्ता खात्यावर जमा होण्यास सुरुवात
अध्यक्ष विठ्ठलराव हलगेकर यांनी दिली माहिती खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथील महालक्ष्मी ग्रूप संचालित लैला साखर कारखाण्याचा दुसरा हप्ता १७५ रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती लैला शुगर्स कारखान्याचे अध्यक्ष, श्रीमहालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक व भाजप नेते विठ्ठलराव हलगेकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. …
Read More »क्रिडा स्पर्धेत किरावळे शाळेचे यश
खानापूर (विनायक कुंभार) : गुंजी येथे नुकत्याच पार पडलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये किरावळे शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. मुलींच्या कबड्डी संघाने प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच वैयक्तिक क्रीडा स्पर्धामध्ये जयश्री ज्योतिबा गोडसे हिने १०० मी धावणे व लांब उडी मध्ये प्रथम क्रमांक, आरती संजय नाईक हिने ४० …
Read More »शिंदोळी ग्रामपंचायतच्यावतीने अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
खानापूर : खानापूर तालुक्यामध्ये शिंदोळी ग्रामपंचायतच्यावतीने अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माजी सुभेदार नारायण झुंजवाडकर यांच्या हस्ते झेंडा फडकविण्यात आला. त्यानंतर माणिकवाडी गावात विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये अध्यक्ष राजेश पाटील यांनी माजी सैनिक नारायण झुंजवाडकर यांचा शाल श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर कार्यक्रमाला …
Read More »माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांच्या नेतृत्वाखाली खानापूर तालुका भाजपकडून येडियुराप्पा यांचे अभिनंदन
खानापूर (विनायक कुंभार) : भाजप केंद्रीय संसदीय मंडळ व केंद्रीय निवडणूक समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल खानापूर तालुका भाजपकडून माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांचे अभिनंदन करण्यात आले. खानापूर तालुका अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, माजी तालुका पंचायत सदस्य सुरेश देसाई आदींनी त्यांची बेंगलोर येथे भेट घेऊन शुभेच्छा …
Read More »गरबेनट्टी-खैरवाड रस्त्याची दुरावस्था; शासनाचे दुर्लक्ष
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. याकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष झाले आहे. याचे उदाहरण म्हणेज गरबेवट्टी- खैरवाड गावाना जोडणारा 1500 फुट रस्ता असुन या रस्त्याची दयनीय अवस्था झालाी आहे. संगोळी रायन्ना वसतिगृह शाळेच्या विद्यार्थ्यांना तसेच नागरिकाना या रस्त्यावरून ये-जा करणे कठीण झाले आहे. यावेळी रस्त्याची दुरावस्था पाहण्यासाठी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta