Sunday , December 14 2025
Breaking News

खानापूर

कांजळे लोअर प्राथमिक मराठी शाळेच्या एसडीएमसी अध्यक्षपदी दयानंद वाणी

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील निलावडे ग्राम पंचायतीच्या हद्दीतील कांजळे लोअर प्राथमिक मराठी शाळेच्या एसडीएमसीच्या अध्यक्षपदी दयानंद वाणी तर उपाध्यक्षपदी सौ. स्वाती भांतकांडे यांची निवड केली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी निलावडे ग्राम पंचायतीचे उपाध्यक्ष विनायक मुतगेकर होते. प्रारंभी मुलींच्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्याध्यापक एस. एम. पालकर यांनी उपस्थितांचे स्वागत …

Read More »

शांतिनिकेतन सीबीएसई दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या ऋतुजा लक्ष्मण गुरव हिचा सत्कार

खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी (ता.खानापूर) गावची कन्या श्री महालक्ष्मी ग्रुप संचालित शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या सीबीएसई दहावीची विद्यार्थीनी ऋतुजा लक्ष्मण गुरव हिने सीबीएसई दहावीच्या परीक्षेत ९६.२ गुण घेऊन शांतिनिकेतन पब्लिक स्कूलमध्ये प्रथम येण्याचा मान मिळविला. तसेच शांतिनिकेतन पब्लिक स्कूल सीबीएसई दहावीचा निकाल यंदाही १००टक्के लागला आहे. सलग आठव्या वर्षीही १०० टक्के …

Read More »

खानापूर आरोग्य विभागाला मराठीचा विसर

खानापूर : खानापूर तहसीलदार कार्यालयात मराठीला डावलण्याचा प्रकार घडल्यानंतर आता सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यव्यवस्थेचा प्रमुख आधार असलेल्या तालुका सरकारी दवाखान्यालाही मराठीची कावीळ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नव्याने बसविण्यात आलेल्या नामफलकावर मराठीला डावलून केवळ एकाच भाषेला स्थान देण्यात आल्याने मराठी भाषिक नागरिकांची गैरसोय होत आहे. सरकारी दवाखान्याच्या अंतर्गत भागाचे नूतनीकरण केले जात …

Read More »

नोकरी खानापूर हॉस्पिटलमध्ये पण ड्युटी बेळगावात

  प्रशासनाचा अनागोंदी प्रकार खानापूर : खानापूर तालुका सरकारी रुग्णालयातील महिला एमडी डॉक्टर दिडवर्षे झाली बेळगाव जिल्हा रुग्णालयात सेवा बजावत असल्याचे उघड झाले आहे, यामुळे तालुक्यातील रुग्णांची गैरसोय होत आहे. सर्वसामान्यांच्या सोयीसाठी तज्ञांची नियुक्ती केलेली असते पण केवळ स्वतःच्या सोयीसाठी डेप्युटेशन करून घेणे ही संतापजनक बाब आहे तालुक्यातील आरोग्याची समस्या …

Read More »

जांबोटीत संगीताचार्य विष्णू सडेकरांचा गुरुवंदनानिमित्त सत्कार

  खानापूर (प्रतिनिधी) : जांबोटी (ता. खानापूर) येथील संगीताचार्य विष्णू सडेकर यांचा गुरुपोर्णिमेचे औचित्य साधून मणतुर्गे गावच्या बाल शिवाजी भजनी मंडळाच्यावतीने शाल, श्रीफळ, पानविडा देऊन सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या चरणाशी संगीत भजनाची बाल शिवाजी भजनी मंडळाच्या वतीने गुरूवंदना अर्पण करण्यात आली. त्याचबरोबर गुरुजींना नेहमीच तबल्याची साथसंगत करत आलेले त्यांचे …

Read More »

यंदाही शांतिनिकेतन सीबीएसई दहावीचा निकाल 100 टक्के

  खानापूर : तोपिनकट्टी (ता. खानापूर) श्रीमहालक्ष्मी ग्रुप संचालित शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या सीबीएसई दहावीचा निकाल यंदाही 100 टक्के लागला आहे. सलग आठव्या वर्षाही 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. नुकताच जाहीर झालेल्या सीबीएसई दहावीच्या परीक्षेत शांतिनिकेतन पब्लिक स्कूलचे 139 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सलग आठ वर्षे शांतिनिकेतन पब्लिक …

Read More »

९९ लाखाच्या रस्त्याची वर्षभरात दैना

  बिदरभावी, लोकोळी, कमशिनकोप रस्ता; नागरिकांतून संताप खानापूर : वर्षभरापूर्वी ९९ लाख ४८ हजार रु. चा निधी खर्ची घातलेल्या बिदरभावी, लोकोळी आणि कमशिनकोप गावाला जोडणाऱ्या सहा किलोमीटर रस्त्याची दैना उडाली आहे. वर्षभरताच नागरिकांच्या वाट्याला निकृष्ट दर्जाचा खड्डेमय रस्ता आल्याने संताप व्यक्त करण्यात येतो आहे. नाबार्डच्या फंडातून या रस्त्यांच्या विकासासाठी ९९ …

Read More »

खानापूर तालुक्यातील १०६ गावाना देगांव बहुग्राम योजनेचा होणार लाभ

खानापूर (प्रतिनिधी) : केंद्र व राज्य सरकारच्यावतीने शाश्वत पाणी योजनांचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे खेडोपाडी जनतेला शुध्द पिण्याचे पाणी मिळण्यासाठी कित्तुर व खानापूर तालुक्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत देगांव बहुग्राम पाणी योजनेसाठी ५६५ कोटी रुपये अनुदान मंजुरीचा निर्णय कॅबिनेट बैठकीत झाल्याने खानापूर तालुक्यातील १०६ गावाचा या योजनेत समाविष्ट केल्याने घर …

Read More »

मुघवडे मार्गावरील पूल धोकादायक

  खानापूर : मुघवडे मार्गावर मळव नजीकचा मलप्रभा नदीवरील पूल अपघातांना निमंत्रण देत आहे. पुलावर खड्डे पडून पाणी साचल्याने पूल धोकादायक बनला असून कठडे वाहून गेल्याने वाहतुकीला देखील धोका निर्माण झाला आहे. सदर पूल हा आठ गावांसाठी आधार आहे. पूर्वी हा पूल नव्हता, तेव्हा नागरिकांना लाकडी सकवावरून ये-जा करावी लागत …

Read More »

खानापूर – रामनगर रस्त्याचे काम लवकरच करण्याचे आश्वासन

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयास निवेदन खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज धारवाड येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयातील प्रकल्प संचालक यांना निवेदन देण्यात आले.  खानापूर ते रामनगर पर्यंत हा महामार्ग निर्माण करण्याचे काम काही वर्षापासून या-ना त्या कारणाने रखडलेला आहे. या महामार्गावर अवलंबून …

Read More »