खानापूर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने कस्तुरीरंगन अहवालाच्या अंमलबजावणीसाठी सुचना जारी केली असून 60 दिवसाची मुदत दिली आहे. याला तालुक्यातील विविध गावातून तसेच संघटनांतून विरोध करण्यात येत असून यासाठी तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्रीत येऊन अभ्यासु जानकाराच्या सल्ल्यानुसार यावर चर्चा करून योग्य ती पावले उचलावी, अशी माहिती मणतुर्गा गावचे व …
Read More »निट्टूर मराठी शाळेची इमारत व व्यायाम शाळेची खोली जमीनदोस्त; तहसीलदारांना निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : निट्टूर (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेची इमारत तसेच श्री स्वामी विवेकानंद व्यायाम शाळेची खोली नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे जमिनदोस्त झाल्या. त्यामुळे मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना तसेच श्री स्वामी विवेकानंद व्यायाम शाळेच्या व्यायामपट्टूची मोठी समस्या निर्माण झाली आहे. तेव्हा तहसीलदारांनी पाहणी करून समस्या दुर करावी, अशा मागणीचे …
Read More »बिडी येथील नेहरू मेमोरियल संयुक्त पदवीपूर्व महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
खानापूर : बिडी ता. खानापूर येथील नेहरू मेमोरियल संयुक्त महाविद्यालयत इयत्ता दहावीच्या आणि बारावी परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच इयत्ता अकरावी, नववी व आठवीत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार करून, आई-वडीलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून तसेच मोबाईलचा कमीत वापर करावा, नवीन शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या …
Read More »गर्लगुंजीच्या अजित पाटीलांची पुणे शहर भाजप माजी सैनिक आघाडी अध्यक्षपदी निवड
खानापूर (प्रतिनिधी) : मुळचे गर्लगुंजी (ता. खानापूर) गावचे सुपुत्र व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले माजी सैनिक अजित कल्लापा पाटील यांची पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या माजी सैनिक आघाडी अध्यक्ष पदी निवड झाल्याचे पत्रक पुणे शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आमदार जगदीश तुकाराम मुळीक यानी देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. …
Read More »खानापुरात बस अभावी नागरिकांचे हाल
खानापूर : खानापूर येथून सकाळच्या वेळी बेळगाव येथे महाविद्यालयीन व इतर शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जातात सकाळी सात ते नऊ या वेळेत बस उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. याबाबत येथील आगार प्रमुखांना वारंवार विनंती करण्यात आलेली आहे. मात्र आगार प्रमुख दुर्लक्ष करत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत …
Read More »खानापूर तालुक्यातील ‘ती’ गावे इको सेन्सिटिव्ह झोनमधून वगळा
खानापूर तालुका म. ए. समितीचे जिल्हाधिकार्यांना निवेदन खानापूर : खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील संबंधित 62 गावे इको सेन्सिटिव्ह झोनच्या कक्षेतून वगळण्यात यावीत. त्याचप्रमाणे या झोन संबंधी आक्षेप नोंदवण्यासाठीची 60 दिवसांची मुदत वाढवून देण्यात यावी, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्याय दंडाधिकारी यांच्याकडे केली आहे. …
Read More »खानापूरच्या दुर्गम भागात 75 वर्षानंतर डॉ. सरनोबत यांच्या प्रयत्नाने गावोगावी रेशन वाटप
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका अतिदुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्याच्या दुर्गम भागात 75 वर्षानंतरही गावोगावी रेशन वाटप केले जात नव्हते. ही भाजप नेत्या व भाजप महिला मोर्चा व्हाईस प्रेसिडेंट डॉ. सोनाली सरनोबत यांच्या खानापूर येथील तक्रार निवारण कार्यालयात दुर्गम भागातील 23 गावांनी तक्रार नोंदविली. याची दखल घेऊन जुलै …
Read More »इको सेन्सिटिव्ह झोन बैठकीत आ. डॉ. अंजली निंबाळकर सहभागी
बेंगळुरू : भारत सरकारने 15 राज्यांमधील एकूण 56.825 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ पश्चिम घाट पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील प्रदेश म्हणून अधिसूचित केला आहे. या अधिसूचनेवर चर्चा करण्यासाठी काल मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. खानापूरच्या आमदार डॉ. निंबाळकर यांनीही या बैठकीत सहभागी होऊन सूचना मांडल्या. पश्चिम घाट प्रदेशातील लोकांचे जीवन सुसह्य …
Read More »मळव गावात घर कोसळून लाखो रूपयांचे नुकसान, मदतीचे आवाहन
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात सतत होणार्या मुसळधार पावसामुळे निलावडे ग्राम पंचायत हद्दीतील मळव (ता. खानापूर) येथील गरीब शेतकरी कुटुंबातील सरस्वती बुध्दापा गावडे यांच्या घराच्या भिंती सोमवारी रात्री कोसळून लाखो रूपयाचे नुकसान झाले. त्यात त्याची संसार उपयोगी भांडी, कपाटे, कपडे, धान्य, पैसा, दागदागिने जमिनीत गाढले गेले. या …
Read More »गर्लगुंजी येथे दोन घरात चोरी..!
खानापूर : खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी येथे काल रात्री एकाच दिवशी दोन घरफोड्या झाल्या. मोठ्या प्रमाणात रोकड व सोन्याचे दागिने लंपास करून चोरट्यांनी पलायन केले. गर्लगुंजी येथील शिवाजी नगर येथील रेमा नारायण गोजेकर यांचे घर फोडून चोरट्यांनी 5 ग्रॅम सोन्याची चेन, 5 ग्रॅम सोन्याची अंगठी, 3 ग्रॅम सोन्याचे दागिने असा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta