Monday , September 21 2026
Breaking News

निट्टूर ग्राम पंचायतीचे पीडीओ व क्लार्क लाचप्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : निट्टूर (ता. खानापूर) येथील ग्रामपंचायतीचे पीडीओ श्रीदेवी गुंडापूर व क्लार्क सिध्दापा नाईक यांच्यावर लाच प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.
या दोघावर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
निट्टूर ग्राम पंचायतीच्या हद्दीतील प्रभूनगर (ता. खानापूर) येथील रामचंद्र पाटील यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.
वारसा दाखल प्रकरणी गेल्या तीन महिन्यापासून रामचंद्र पाटील हे पंचायतीला भेट देत होते. मात्र पीडीओ व क्लार्क यानी याबाबत मोठ्या रक्कमेची मागणी केली होती.
त्यानंतर मध्यस्थाकडून ४००० रूपये ठरवण्यात आले.
रामचंद्र पाटील यांनी गुरूवारी दि. ११ रोजी सकाळी एसीबीशी संपर्क करून यासंबंधी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
निट्टूर ग्राम पंचायतीचे पीडीओ श्रीदेवी व क्लार्क सिध्दापा नाईक यांना एसीबीने ताब्यात घेतले आहे. एसीबीेचे अधीक्षक बी. एस. नेमगौडा व उपअधीक्षक करूणकर शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *