Sunday , December 14 2025
Breaking News

खानापूर

मेरडा ग्रा. पं. सदस्य महाबळेश्वर पाटीलकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील मेरडा गावचे सुपुत्र व उद्योजक हलगा ग्राम पंचायतीचे सदस्य शिक्षणप्रेमी महाबळेश्वर पाटील गेल्या कित्येक वर्षापासुन मेरडा प्राथमिक मराठी शाळेत हजर विद्यार्थ्याना प्रत्येक दिवसाला एक रूपया देण्याचा उपक्रम राबविला. त्यामुळे शाळेत विद्यार्थ्याची पटसंख्या वाढली, मुलाना नियमित शाळेत जाण्याची सवय लागली. त्याच्या या उपक्रमामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांनाही आर्थिक …

Read More »

मराठी भाषिकांनी समितीच्या झेंड्याखाली एकत्र येणे गरजेचे : ज्येष्ठ सीमासत्याग्रही नारायण लाड

खानापूर : सीमालढा अंतिम टप्प्यात असताना तालुक्यातील जनतेने एकजुटी दाखवून दिली पाहिजे. त्यासाठी सर्व मराठी भाषिक जनतेने समितीच्या झेंड्याखाली एकत्र येणे गरजेचे आहे. तसेच खानापूर समितीने एक सक्षम अध्यक्ष निवडावा ज्याला सीमाप्रश्नाचा सखोल अभ्यास असला पाहिजे. न्यायालयीन कामकाजाचा अभ्यास आहे. मराठी भाषिकांच्या समस्या परखडपणे मांडणारा त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील नेत्यांच्या संपर्कातला संघटक …

Read More »

खानापूर तालुक्यातील दुर्गम गावांना रस्ते करून द्या : धनश्री सरदेसाई-जांबोटकर

खानापूर : खानापूर तालुक्यातील घनदाट जंगलातील गावांना रस्ता तयार करण्याचे आवाहन भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य धनश्री सरदेसाई-जांबोटकर यांनी जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना केले. खानापूर तालुक्यातील दुर्गम गावांना चांगले रस्ते नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच ग्रामस्थांना प्रवास करण्यास त्रास होत आहे. खानापूर-गोवा रस्त्यापासून चापगाव 5 किमी., पाली 4 किमी, जांबोटी-गोवा मुख्य …

Read More »

व्हिडीओ चुकीचा असल्याची देवाप्पा गुरव यांची स्पष्टोक्ती

खानापूर : रविवार दि. 29 रोजी दुपारी खानापूर तालुका समितीला कांहीं कार्यकर्त्यांनी मला जबरदस्तीने नेऊन खोटेनाटे सांगून खानापूर समितीच्या एकीच्या प्रक्रियेत बाधा आणण्याच्या हेतूने माझ्याकडून त्यांनी लिहिलेले वाचून घेतले. त्या दरम्यान त्यांनी जाणीवपूर्वक माझा व्हिडीओ काढला आणि तो समाज माध्यमांवर प्रसारित केला. त्यामुळे तालुक्यातील समिती कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण झाला. त्याकरिता …

Read More »

खानापूर तालुका समितीची महत्वपूर्ण बैठक सोमवारी

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक सोमवार दि. 30 मे रोजी राजा शिवस्मारक येथे बोलाविण्यात अली आहे. या बैठकीत 1 जून रोजी होणाऱ्या हुतात्मा दिन गांभीर्याने पाळणे, आगामी तालुका व जिल्हा पंचायत निवडणूका संदर्भात चर्चा करणे, महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची सीमाप्रश्न उच्चधिकार समितीच्या अध्यक्षपदी निवड …

Read More »

इदलहोंड हायस्कूलच्या विद्यार्थीनींचा ग्रामपंचायतीच्यावतीने सत्कार

खानापूर (प्रतिनिधी) : इदलहोंड (ता. खानापूर) येथील गुरूवर्य शामराव देसाई हायस्कूलच्या विद्यार्थीनी प्रनिषा चोपडे हिने एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत मराठी विभागातून 99.36 टक्के मार्क घेऊन तालुक्यात प्रथम आली. तसेच अमुल्या कुलम हिने 97.12 टक्के गुण मिळविले, तर प्रांजल पाटील हिने 96.80 टक्के गुण मिळविले असल्याने त्यांचा सत्कार इदलहोंड …

Read More »

खानापूर-जांबोटी क्राॅसवरील रस्ता सीडीच्या कामाला सुरूवात

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील जत -जांबोटी महामार्गावरील रस्त्याचे डांबरीकरण व रुंदीकरण तसेच सीडी आदी कामासाठी २५ कोटीचे अनुदान मंजुर करून सार्वजनिक बांधकाम खात्याने काम पूर्णत्वाकडे नेले आहे. मात्र खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील रस्त्याच्या सीडीचे काम अद्याप झाले नव्हते. त्यामुळे अवकाळी पावसामुळे येथे पाणी साचुन वाहनधारकांची तसेच प्रवाशांची गैरसोय होत …

Read More »

मन्सापूरच्या ग्रा. पं. सदस्य रिचर्ड मिनिजीसने साकारली कृषी होडाची योजना

खानापूर (प्रतिनिधी) : भारत हा कृषी प्रदान देश आहे. कृषी खात्याच्यावतीने अनेक योजना शेतकरी वर्गाला मिळत आहेत. खानापूर तालुक्यातील मन्सापूरचे ग्रा. पं. सदस्य रिचर्ड मिनिजीस यांनी मन्सापूर येथील सर्वे नंबर ८४/ ४ शेतात कृषी होडा योजना राबवून शेतकरी वर्गाला एक आदर्श दाखवला आहे. त्यांनी आपल्या शेतात कृषी खात्याच्यावतीने ७० फूट …

Read More »

खानापूर भाजपच्यावतीने एसएसएलसी परीक्षेत तालुक्यात व्दितीय आलेल्या प्रियांका देवलतकरचा सत्कार

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत ताराराणी हायस्कूलची विद्यार्थीनी व मणतुर्गा गावची प्रियांका पुंडलिक देवलतकर हिने दहावीच्या परीक्षेत ६१७ मार्क (९८.७२) घेऊन तालुक्यात द्वितीय येण्याचा मान मिळविला. त्यामुळे मणतुर्गा गावाचे नाव तालुक्यात प्रसिध्द केले. म्हणून भाजप तालुका सेक्रेटरी गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली …

Read More »

खानापूर युवा समितीचे तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी व बस आगार प्रमुखांना निवेदन

खानापूर : गेल्या काही दिवसापासून सातत्याने खाद्यपदार्थांच्या व जीवनावश्यक वस्तूचे दर वाढल्याने महागाईचा भस्मासुर सामान्य जनतेच्या समोर आ वासून उभारला आहे, यासाठी सामान्य जनतेचे हाल होत असल्याने ही महागाई केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी दखल घेऊन महागाई दर कमी करण्यासाठी त्वरित पावले उचलावीत, जरी गेल्या दोन दिवसापूर्वी केंद्र सरकारने …

Read More »