Sunday , June 28 2026
Breaking News

कागलचे राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशनतर्फे पर्यावरण जागृतीबद्दल निपाणीतील नामदेवराव चौगुले सन्मानित

Spread the love

 

 

निपाणी (वार्ता) : निपाणीतील रहिवासी, पर्यावरण प्रेमी शिक्षक आणि भूमी वात्सल्य सोशल फाउंडेशनचे संस्थापक नामदेवराव चौगुले हे पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि सामाजिक जनजागृतीचे कार्य करत आहे.
या कार्याची दखल घेत अखिल कर्नाटक साहित्य परिषदेचा राज्य पुरस्कार देऊन मानेवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला होता. त्याची दखल घेऊन कागल येथील राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन आणि राजमाता जिजाऊ महिला समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात पर्यावरण जागृतीबद्दल नामदेवराव चौगुले यांचा समरजीत घाटगे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याशिवाय त्यांच्या धर्मपत्नी शिक्षिका अपूर्वा चौगुले यांचा कागल येथील गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे त्यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
समरजीत घाटगे यांनी, चौगुले दाम्पत्यांनी ज्ञानदानाबरोबरच पर्यावरण जागृती आणि पर्यावरण वाढवण्याचा घेतलेला वसा कौतुकास्पद आहे. आतापर्यंत कर्नाटक महाराष्ट्रात दहा हजार पेक्षा अधिक रोपे लावून ती जगविले आहेत. त्यांचा आदर्श इतर शिक्षकासह सामाजिक मंडळांनी घेतल्यास सर्वत्र हिरवीगार देवराई निर्माण होण्यास वेळ लागणार नसल्याचे सांगितले. नामदेवराव चौगुले यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून वर्षभर विविध कार्यक्रमांचा निमित्ताने नातेवाईक मित्रमंडळींना गुलाबाची 152 रोपे भेट देऊन ती जगविण्याची विनंती करण्यात येते. त्यासाठी सामाजिक मंडळ शाळा कॉलेजचे सहकार्य लाभत आहे.
राजे विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशनतर्फे ‌आयोजित कार्यक्रमात आपणाला मिळालेला सन्मान हा माझ्या आयुष्यातील सुवर्णक्षण ठरल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये ‘अग्नि सुरक्षा’ प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

Spread the love    निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचलित निपाणी येथील मॉडर्न इंग्लिश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *