Sunday , December 14 2025
Breaking News

खानापूर

खानापूरच्या बसस्थानकात समस्यांचे साम्राज्य

प्रवाशी वर्गातून नाराजीचे सुर खानापूर (वार्ता) : खानापूर तालुक्यातील एकमेव बसस्थानक म्हणून ओळखल्या जाणार्‍या खानापूर शहरातील जांबोटी क्रॉसवरील बसस्थानक म्हणजे समस्यांचे साम्राज्य पसरले आहे. बसस्थानकात पाण्याचा जलकुंभ बंदच खानापूर शहरातील बसस्थानकात गेल्या कित्येक वर्षांपासून जलकुंभ बंदच आहे. या जलकुंभात पाण्याचा साठा नसतो. जलकुंभाच्या चाव्या सुध्दा मोडून पडलेत. त्यामुळे प्रवाशांना बसस्थानकात …

Read More »

कोरोनाच्या महामारीने खानापूर जनावराच्या बाजारात मंदी

खानापूर (वार्ता) : कोरोनाच्या महामारीमुळे सारा देश कोलमडला आहे. अनेक संकटे आली. त्यामुळे यातून सावरणे अवघड झाले आहे. याचा अनुभव खानापूर तालुक्याच्या जनावरांच्या आठवडी बाजारात अनुभवयास मिळाला. जानेवारी महिन्यात अनेक रविवार हे कर्फ्यूमुळे बाजार भरू शकले नाही. त्यामुळे जनावरांची खरेदी विक्री झाली नव्हती. रविवारी दि. 30 रोजी खानापूर येथील रूमेवाडी …

Read More »

पालीच्या शेतकर्‍यावर अस्वलाचा हल्ला

शेतकरी गंभीर जखमी खानापूर (वार्ता) : खानापूर तालुक्यातील पाली येथील शेतकर्‍यावर रविवारी दि. 30 रोजी दुपारी 1 वाजता अस्वलाने अचानक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, पाली (ता. खानापूर) येथील शेतकरी विठ्ठल सुटापा झरंबेकर (वय 65) हे नेहमीप्रमाणे रविवारी शेताकडे गेले होते. दरम्यान अस्वलाने …

Read More »

खानापूर तालुका राज्य नोकर संघाचे तहसीलदाराना निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : बिदर जिल्ह्यातील हुमनाबाद तालुक्याचे तहसीलदार प्रदिपकुमार हिरेमठ यांच्यावर शुक्रवारी दि. २८ रोजी समाजकंटकानी त्यांच्या कार्यालयात घुसून सरकारी कामात व्यत्यय आणत त्यांच्यावर हल्ला केला. त्या हल्लेखोराचा तपास करून त्यांना कठोर शासन करावे. सरकारी नोकरवर्गाला न्याय मिळवून द्यावा. या मागणीसाठी खानापूर तालुका सरकारी नोकर संघाच्यावतीने खानापूर तहसील कार्यालयावर मोर्चा …

Read More »

खानापूर नगरपंचायतीच्या स्थायी कमिटी अध्यक्षपदी प्रकाश बैलूरकर

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील नगरपंचायतीच्या स्थायीकमिटी अध्यक्षपदाची निवड नुकताच पार पडली. यावेळी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मजहर खानापूरी अध्यक्षस्थानी होते. स्थायी कमिटीसाठी ११ नगरसेवकाची यादी नगराध्यक्षांच्याकडे देण्यात आली. यामध्ये नगरसेवक प्रकाश बैलूरकर यांची कमिटी अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तर स्थायी समिती सदस्यपदी उपनगराध्यक्षा लक्ष्मी अकंलगी, नगरसेवक आपय्या कोडोळी, विनायक कलाल, …

Read More »

खानापूरात इंदिरा कॅन्टीन उभारण्याची केवळ अफवाच

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याला शहराच्या ठिकाणी इंदिरा कॅन्टीन उभारण्यासाठी सन २०१८ साली मोठी चर्चा झाली. यावेळी शहरात सरकारी जागेची समस्या निर्माण झाली. व येथील सरकारी दवाखान्याला लागुन इंदिरा कॅन्टीनच्या जागेची पर्यायी व्यवस्था झाली. व लागलीच इंदिरा कॅन्टीनच्या कामाला सुरूवात झाली. काही दिवसात इंदिरा कॅन्टीनचा पाया उभारण्यात आला. फाऊंडेशनही झाले. …

Read More »

गणेबैलच्या टोलनाक्याजवळ दुचाकीचा अपघात; एक गंभीर जखमी

खानापूर (प्रतिनिधी) : पणजी -बेळगाव महामार्गावरील गणेबैजवळील टोलनाक्याजवळ दुचाकी आणि छोटा हत्ती चार चाकी वाहनांची समोरासमोर अपघात होऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. जखमीचे नाव महादेव गोपाळ खाबले (वय २३) राहणार खेमेवाडी (ता. खानापूर) असुन तो बेळगांवहुन खानापूरकडे येत होता. याचवेळी माजी आमदार व डीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील हे बेळगाहुन …

Read More »

सरकारी कॉलेजला देणगी दाखल नियती फाउंडेशनकडून 40 बेंच

खानापूर : बेळगावच्या भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी आपली संस्था नियती फाउंडेशनच्या माध्यमातून आज गुरुवारी खानापूर प्रथम दर्जा सरकारी महाविद्यालयाला सुमारे 1 लाख रुपये किंमतीचे 40 बेंचेस देणगी दाखल दिले. खानापूर प्रथम दर्जा सरकारी महाविद्यालयाची पटसंख्या सुमारे 1 हजार इतकी आहे. या ठिकाणी बीबीए, बीए आणि बीकॉम अभ्यासक्रम शिकविला …

Read More »

युवा समितीतर्फे हलशीवाडी, हलशी, गुंडपी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

  खानापूर : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे बुधवारी हलशीवाडी, हलशी व गुंडपी येथील सरकारी मराठी शाळेत शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. हलशीवाडी येथे शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष विनोद देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर निवृत्त जवान विलास देसाई, शुभम देसाई, विनायक देसाई यांच्या हस्ते इयत्ता …

Read More »

गर्लगुंजी प्राथ. मराठी मुलीच्या शाळेत पालक मेळावा संपन्न

खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी मुलींच्या शाळेमध्ये एस्.डी.एम्.सी. व पालक मेळावा सोमवार दि. २४ रोजी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका श्रीमती एस. वाय. सोनार होत्या. कार्यक्रमाला शाळा सु़धारणा समितीचे सदस्य आणि पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी पालकांचे स्वागत करून सरस्वती प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची …

Read More »