खानापूर : बेळगाव -गोवा राष्ट्रीय महामार्गात शेत जमीन गेलेल्या प्रभूनगर, निट्टूर, गणेबैल, हलकर्णी, हत्तरगुंजी, करंबळ, होनकल, माणिकवाडी, सावरगाळी, माडीगुंजी, लोंढा गावातील भूसंपादन केलेल्या जमिनीचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. तसेच (अतिरिक्त भूसंपादन) ॲडिशनल जमिनीचे पैसे मिळाले नाहीत. पैसे मिळवण्यासाठी शेतकरी १० वर्षापासून प्रांताधिकार्यांच्या ऑफिसमध्ये हेलपाटे मारत आहेत. या शेतकऱ्यांकडे ना …
Read More »स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी झपाटून अभ्यास करावा : निरंजन सरदेसाई यांचे प्रतिपादन
खानापुरात मराठी प्रेरणा मंचच्या वतीने गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार जांबोटी : आजच्या स्पर्धात्मक युगात टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या आहारी न जाता ध्येय गाठण्यासाठी झपाटून अभ्यास करावा. सुरुवातीपासून विषय समजावून घेऊन आपले लक्ष अभ्यासावर केंद्रित केल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती न वाटता परीक्षा एक स्वतःला सिद्ध करण्याची संधी वाटेल, असे प्रतिपादन …
Read More »खानापूर तालुक्यात पावसाचा जोर कायम; विद्युत खांब कोसळले!
खानापूर : गेल्या दोन दिवसांपासून खानापूर तालुक्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. गेल्या २४ तासात पावसाची कणकुंबीत ७४.४ मी मि. सर्वात जास्त पावसाची नोंद झाली असुन तालुक्याच्या लोंढा, गुंजी, अमगाव, पारवाड, कणकुंबी तसेच शिरोली वाडा आदी जंगलभागात सतत पडणाऱ्या पावसामुळे विद्युत खांब कोसळून पडले आहेत. तसेच विद्युतत तारा तुटून …
Read More »चापगावात यडोगा हद्दीत घरफोडी, नागरिकांतून घाबराट
खानापूर (प्रतिनिधी) : चापगाव (ता. खानापूर) गावच्या यडोगा रोडवरील रमेश तुकाराम पाटील यांच्या घरात चोरी झाल्याची घटना शनिवारी दि. ८ रोजी उघडकीस आली. चोरट्यांनी पाठीमागील दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असुन तिजोरी फोडली व त्यातील कपडे अस्ताव्यस्त करून काहीतरी सापडते काय याचा प्रयत्न केला असुन त्यामध्ये कानातील सोन्याचे मनी …
Read More »खानापूरसह तालुक्यात पावसाची संततधार सुरूच; कणकुंबीत ५८.४ मी. मी. पावसाची नोंद
खानापूर : खानापूर शहरासह तालुक्यात पावसाला उशीरा सुरूवात झाली. जुन महिन्यात पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे भात पेरण्या वेळेत झाल्या नाहीत. भात उगवण योग्य झाली नाही. त्यामुळे दुबार पेरणी संकट आले. काही भागात भात लागवडीसाठीची तयारी करण्यात आली आहे. जुलै महिन्यात पावसाने तुरळक सुरूवात केली. मात्र गेल्या दोन दिवसांपासून …
Read More »ज्येष्ठ नागरिक संघटनेची 10 जुलै रोजी महत्त्वाची बैठक
खानापूर : कर्नाटक राज्य ज्येष्ठ नागरिक संघटना, उपघटक खानापूर तालुका, यांची महत्त्वाची मासिक बैठक सोमवार दिनांक 10 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजता श्री संत ज्ञानेश्वर मंदिर खानापूर येथे बोलाविण्यात आली आहे. तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन ज्येष्ठ नागरिक संघटना अध्यक्ष व समिती यांनी केले आहे. या बैठकीत …
Read More »खानापूर समिती पदाधिकारी निवडीचा तिढा सुटेल!; निमंत्रकांच्या भूमिकेकडे लक्ष
खानापूर : खानापूर महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकारी निवडीचा तिढा अधिक गुंतताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत मराठी माणसाचे पुरते पानिपत झाले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा दारुण पराभव झाला. हा पराभव मराठी माणसाच्या जिव्हारी लागणारा होता. निवडणुकीनंतर चिंतन बैठक बोलावणे गरजेचे …
Read More »खानापूर हेस्काॅम खात्याचे नागरिकांना आवाहन
खानापूर : खानापूर हेस्काॅम खात्याच्या कार्यालयात गेल्या दोन महिन्यापासून वीज बिल भरण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे नागरिकांतून वीज बिल भरण्यासाठी जादा खिडकीची मागणी होत होती. मात्र १ जुलै पासून हेस्काॅम खात्याची वीज बिले भरण्यासाठी ऑनलाईनव्दारे, फोन पे, गुगल पे आदी सेवा उपलब्ध आहे. तेव्हा घरी बसल्याच हेस्काॅम खात्याची …
Read More »नंदगड मार्केटिंग सोसायटीमधील खत विक्री गैरव्यवहाराबद्दल चौकशी करा
खानापूर समितीकडून लोकायुक्तांकडे जाण्याचा इशारा खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने एडी ऑफिसर खानापूर यांना ३० जून रोजी खानापूर तालुका मार्केटिंग सोसायटी नंदगड मधील खत विक्रीच्या गैरव्यवहाराबद्दल निवेदन देण्यात आले. सदर सोसायटीच्या माध्यमातून सरकारमान्य दरानुसार खतांची विक्री करण्याचा नियम आहे. परंतु सरकारी नियम धाब्यावर बसवून या संस्थेचे …
Read More »मास्केनट्टी शिवारात हत्तीकडून पिकाचे नुकसान, वनखात्याने नुकसान भरपाई द्यावी
खानापूर : खानापूर तालुक्यातील भुरूनकी ग्रामपंचायत हद्दीतील मास्केनट्टी शिवारातील सर्वे नंबर ३० मधील ऊस पिकाचे हत्तीकडून प्रचंड नुकसान झाले आहे. दरवर्षी हत्ती कडून पिकाचे प्रचंड नुकसान होते. मात्र सरकारकडून कोणतीच आर्थिक नुकसान मिळत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. तेव्हा संबंधित वनखात्याने याची दखल घेऊन पिकाचे नुकसान टाळण्यासाठी योग्य …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta