Sunday , July 26 2026
Breaking News

कत्तलखान्याला घेऊन जाणाऱ्या १२ म्हशींची हरसनवाडीजवळ सुटका

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्या मार्गे गोव्याकडे कत्तलखान्याला घेऊन जाणाऱ्या जनावरांची सुटका करणे, जनावरांचे मांस घेऊन जाणाऱ्या वाहनांना अडवून पोलिसाच्या ताब्यात देणे हे खानापूर हिंदुत्ववादी संघटना नेहमीच करतात.
अशीच घटना सोमवारी खानापूरातुन चोर्ला मार्गे गोव्याला कंटेनरमधून १२ म्हशी कत्तलखान्याला घेऊन जाताना खानापूर जांबोटी मार्गावरील हरसनवाडी जवळ पकडून त्यांची सुटका करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच खानापूर गुन्हे विभागाचे पोलिस उपनिरीक्षक गिरीश एम यांनी धाव घेऊन वाहन क्रमांक के.ए. ५१/४०६८ कंटेनर ताब्यात घेतला. यावेळी आरोपी अल्ताफ काद्रोळी (वय ३८), शिराज बुध्दीहाळ( वय. ३३) दोघे ही राहणार संपगावी (ता.बैलहोंगल) अशी आरोपीची नावे आहेत. वाहनातील १२ म्हशीची किमत अंदाजे साडे तीन लाख रूपये किमत असुन आरोपीच्या वर अपराध कलम १८७/२०२३ कलम संख्या ०४,०७,१२ या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

ई-केवायसीसाठी एक रुपयाही देऊ नका; खानापूर तालुका गॅरंटी योजना अध्यक्षांचे आवाहन

Spread the love  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका पंचहमी गॅरंटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *