निपाणी (वार्ता) : शेतातील विहिरी जवळ असलेल्या विद्युत मोटर पेटीमध्ये कनेक्शन देण्याचे काम करत असताना विजेचा धक्का बसून वायरमनचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता.३) पट्टणकुडी येथे घडली. उमेश श्रीकांत पाटील (वय ४०, मुळगाव बेनाडी सध्या रा. सुतार गल्ली, पट्टणकडी) असे मृताचे आहे. उमेश पाटील हे वायरमन म्हणून बऱ्याच वर्षापासून …
Read More »निपाणीतील युवकाचा भुदरगड येथे खून; आर्थिक व्यवहारातून खुनाचा संशय
निपाणी (वार्ता) : येथील युवकाला घरातून बोलावून घेऊन जाऊन किल्ले भुदरगड येथे खून केल्याची घटना मंगळवारी (ता.३) सकाळी उघडकीस आली. राहुल शिवाप्पा सुभानगोळ (वय ३२ रा. मुळ गाव मसोबा हिटणी ता. हुक्केरी, सध्या रा. हौसाबाई कॉलनी साखरवाडी, निपाणी) असे या युवकाचे नाव आहे. या खुनामध्ये मुंबई आणि निपाणी येथील …
Read More »महिलांनी समाजाच्या प्रवाहात येण्याची गरज
उपनिरीक्षिका उमादेवी; ‘इनरव्हील’तर्फे पुरस्कार वितरण निपाणी (वार्ता) : सध्या सर्वच क्षेत्रांमध्ये महिला आघाडीवर अद्यापही महिला समाजाच्या प्रवाहात येण्याची गरज आहे. कोणत्याही परिस्थितीत न डगमगता स्व सामर्थ्यावर महिलांनी आपली प्रगती साधावी, असे असे आवाहन उपनिरीक्षका उमादेवी गौडा यांनी केले. येथील इनरव्हील क्लबतर्फे ‘नेशन बिल्डर’ पुरस्कार वितरण सोहळा केएलई कन्नड माध्यम …
Read More »मटका प्रकरणी निपाणीत एकावर कारवाई
निपाणी (वार्ता) : मटका खेळणे आणि घेण्यावर बंदी असताना मटका घेत असताना आढळल्यानंतर निपाणी पोलिसांनी सोमवारी (ता.२) सायंकाळी एकावर कारवाई केली. यशवंत शंकर वालीकर (रा. लक्ष्मीनगर, निपाणी) असे संशयित आरोपीचे नाव आहे. मंडल पोलीस निरीक्षक बी.एस. तलवार यांनी ही कारवाई केली. लक्ष्मीनगर परिसरातील नागरिक अंदर- बहार मटका घेत असल्याची …
Read More »माणुसकीच्या दृष्टीने समाजात कार्य करा
आचार्य श्री १०८ कुलरत्नभूषण मुनी महाराज; बोरगावमध्ये दशलक्षण पर्व निमित्त मिरवणूक निपाणी (वार्ता) : जगणे सोपे असून प्राणी आणि पक्षी देखील जगतात. परंतु जीवन घडविण्याची कला शिकणे सोपे नाही. जो ही कला शिकतो तो जीवनाचा आनंद घेऊ शकतो. शुद्ध जीवन जगण्यात खरा धर्म असून सर्वांनी माणुसकीच्या दृष्टीने समाजात …
Read More »वडिलांच्या स्मृतिदिनी स्वीकारले विद्यार्थ्यांचे पालकत्व
धार्मिक विधींना फाटा; नामदेव चौगुले यांचा उपक्रम निपाणी (वार्ता) : येथील रहिवासी आणि अर्जुनी येथील लाल बहादूर शास्त्री विद्या मंदिर शाळेचे शिक्षक नामदेव चौगुले यांनी आपले वडील विठोबा लक्ष्मण चौगुले यांच्या स्मृती दिनानिमित्त इतर कार्यक्रमांना फाटा देऊन ५ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. याशिवाय शाळेला साऊंड सिस्टिम भेट …
Read More »डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या स्वच्छतेमुळे निपाणीतील उद्याने झाली चकाचक
निपाणी(वार्ता) शहरातील पद्मश्री डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने देशव्यापी स्वच्छता हीच सेवा अभियानात सहभाग नोंदविला. प्रतिष्ठानच्या येथील शेकडो स्वयंसेवकांनी शहरातील उद्याने स्वच्छतेची मोहिम राबवित उद्याने चकाचक केली. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्यावतीने पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भुषण डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली …
Read More »महात्मा गांधींचे विचार युवकांना प्रेरणादायी
प्राचार्या डॉ. जे डी. इंगळे ; ‘देवचंद’मध्ये गांधी जयंती निपाणी (वार्ता) : संस्कारक्षम पिढी निर्माण करण्याचे सामर्थ्य महात्मा गांधीजींया विचारात आहे. स्वच्छता, राष्ट्रसेवा, आत्मनिर्भरता, समाजाविषयी असणारी तळमळ, याबद्दल त्यांचे विचार युवकांना सतत प्रेरणा देतात. युवकांनी गांधीजींचे विचार जीवनामध्ये आचरणात आणल्यास निकोप समाज व राष्ट्र निर्माण होण्यास मदत होईल, असे …
Read More »सीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमावासीयांनी लढण्याची तयारी ठेवा : आमदार निलेश लंके
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे निवेदन निपाणी (वार्ता) : सीमाप्रश्न प्रलंबित असल्याने कर्नाटक सीमाभागातील शैक्षणिक व इतर क्षेत्रातील मोठे नुकसान होत हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून लवकरच सीमा भागातील मराठी भाषिकांच्या बाजूने निकाल लागेल, असा विश्वास आहे. या प्रश्नाबाबत महाराष्ट्रचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मागण्याबाबत चर्चा करणार …
Read More »गांधीजींच्या प्रेरणेतून राष्ट्र उभारणी व्हावी
प्रा. डॉ. अच्युत माने; निपाणीत विविध ठिकाणी गांधी जयंती निपाणी (वार्ता) : महात्मा गांधीजींनी नैतिकतेतून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. हे स्वातंत्र्य आबाधीत ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. अहिंसा मार्गाने त्यांनी इंग्रजांना हाकलून देऊन स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांच्या कार्याचे स्मरण होण्यासह प्रेरणा घेऊन राष्ट्र उभारणीचे काम व्हावे, असे मत प्रा. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta