Sunday , July 26 2026
Breaking News

मटका प्रकरणी निपाणीत एकावर कारवाई

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : मटका खेळणे आणि घेण्यावर बंदी असताना मटका घेत असताना आढळल्यानंतर निपाणी पोलिसांनी सोमवारी (ता.२) सायंकाळी एकावर कारवाई केली. यशवंत शंकर वालीकर (रा. लक्ष्मीनगर, निपाणी) असे संशयित आरोपीचे नाव आहे. मंडल पोलीस निरीक्षक बी.एस. तलवार यांनी ही कारवाई केली.
लक्ष्मीनगर परिसरातील नागरिक अंदर- बहार मटका घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली असून संशयित आरोपीकडून रोख ११०० रुपये, मटका चिट्ठया आणि पेन पोलिसांनी जप्त केला आहे. मटका बंदी कायद्यान्वये संशयिताला अटक करण्यात आले आहे. बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

कारगिल विजय दिनासह सुगते कुटुंबीयांच्या जन्मदिनी वृक्षारोपण

Spread the love  शहीदांना हरित अभिवादन; भूमी वात्सल्य फाउंडेशनचा पर्यावरणपूरक उपक्रम निपाणी (वार्ता) : कारगिल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *