Wednesday , December 10 2025
Breaking News

निपाणी

यमगर्णीमध्ये गॅस स्फोट होऊन लाखाचे नुकसान; एक जण जखमी

  निपाणी (वार्ता) : स्वयंपाक गॅसचा अचानक स्फोट होऊन एक जण जखमी तर लाखाचे नुकसान झाल्याची घटना येथे शुक्रवारी (ता.३०) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. युवराज देसाई असे या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. यावेळी तब्बल सव्वा तास अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठी दुर्घटना …

Read More »

प्रभावी कामगिरी करणाऱ्या जामदारांच्या निवृत्तीमुळे पोकळी

  प्राचार्या जी. डी. इंगळे; प्रा. नानासाहेब जामदार यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार निपाणी (वार्ता) : देवचंद महा विद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. नानासाहेब जामदार हे मराठी विषयावर प्रभुत्व असलेले अभ्यासू व व्याकरणावर प्रभुत्व असलेले व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी महाविद्यालयात घडवलेले विद्यार्थी व महाविद्यालयासाठी दिलेला अनमोल महत्वाचे आहे. अशा प्रभावी कामगिरी करणाऱ्या …

Read More »

ऊस एफआरपीतील १० रुपयांची वाढ फसवी

  राजू पोवार; रयत संघटनेकडून केंद्राचा निषेध निपाणी (वार्ता) : ऊस एफआरपी रकमेत केवळ १० रुपयांची वाढ केल्याबद्दल चिकोडी जिल्हा रयत संघटनेच्या वतीने शुक्रवारी (ता. ३०) निषेध करण्यात आला. उत्पादन खर्च आणि खतांच्या दरामध्ये एकूण ५२ टक्के वाढ झाली आहे. त्या प्रमाणानुसार केंद्र सरकारने एफआरपीमध्ये १० रुपयांची केलेली वाढ ही …

Read More »

निपाणीत दिवसभर पावसाची उघडझाप

  गटारी तुंबून सांडपाणी रस्त्यावर; आठवडी बाजारात दलदल निपाणी(वार्ता) : गेल्या दोन दिवसापासून निपाणी शहर व परिसरात पावसाच्या किरकोळ सरी पडत असल्याने गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे आता शेती कामाला वेळ येणार आहे. गुरुवारी (ता.२९) दिवसभर शहर आणि परिसरात पावसाची उघडझाप सुरू होती. त्यामुळे गटारी तुंबून सांडपाणी आणि कचरा रस्त्यावर …

Read More »

जी. आय. बागेवाडी महाविद्यालयाच्या एनएसएस विशेष शिबिराची यरनाळमध्ये सांगता

  निपाणी (वार्ता) : केएलई संस्थेचे जी. आय. बागेवाडी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे वार्षिक विशेष शिबिराची यरनाळ येथे सांगता करण्यात आली. शिबिरात स्वच्छता अभियान, गटारु-रस्ते स्वच्छता, स्मशानभूमीची साफसफाई व सपाटीकरण करण्यात आले. कृषी पिकांबाबत जनजागृती, पर्यावरण संरक्षण आणि प्लास्टिकमुक्त भारत जनजागृती, ऐतिहासिक रामलिंग मंदिरातील स्वच्छता, ऐतिहासिक वास्तूंच्या संरक्षणाबाबत जनजागृती, घर …

Read More »

मोहनलाल दोशी विद्यालयात एकादशी निमित्त दिंडी, पालखी सोहळा

  निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त गुरुवारी (ता.२९) दिंडी व पालखी सोहळा झाला. मुख्याध्यापिका एस. एम. गोडबोले यांनी पालखीचे पूजन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषेत डोईवर तुळस व कलश घेऊन लेझीमच्या ठेक्यावर वीणा, टाळ व मृदंगासोबत विठूनामाचा गजर करत दिंडीने बसवाननगर मधून …

Read More »

सेवानिवृत्ती निमित्त प्रा. नानासाहेब जामदार यांचा उद्या सत्कार

  निपाणी(वार्ता) येथील अर्जुननगर(ता. कागल) येथील देवचंद महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक नानासाहेब जामदार हे ३५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर शुक्रवारी (ता.३०) सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त महाविद्यालयातर्फे त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. प्रा. नानासाहेब जामदार यांनी आतापर्यंत कारवार, कणकवली, निपाणी अशा विविध ठिकाणी एकूण ३५ वर्षे ज्ञानदानाचे काम केले आहे. येथील …

Read More »

निपाणीच्या डाॅ. ऋचा चिकोडे वैद्यकीय क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरील डी.एन.बी पदवीने सन्मानीत

  निपाणी (वार्ता) : भारत सरकारच्या आरोग्य व कुंटूब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत स्वायत्त शैक्षणिक संस्था आयुर्विज्ञान राष्ट्रीय परीक्षा बोर्ड नवी दिल्ली यांनी 2022-23 या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरील पदव्युत्तर समकक्ष डीएनबी या पदवीसाठी नवी दिल्ली येथे परीक्षा घेतली होती. या परीक्षेत निपाणीची सुकन्या डाॅ. ऋचा मधुसूदन चिकोडे ही …

Read More »

‘अंकुरम’मध्ये रंगला माऊलीचा रिंगण सोहळा!

  स्कूलमध्ये भरली विठू नामाची शाळा; आषाढी एकादशी निमित्त आयोजन निपाणी (वार्ता) : येथील कोडणी रोडवरील अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये नेहमीच सांस्कृतिक वारसा जपत विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक व पारंपारिक शिक्षणावरही भर दिला जात आहे. त्यानुसार गुरुवारी (ता.२९) होणाऱ्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता.२८) शाळेमध्ये प्राचार्या चेतना चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी …

Read More »

साबुदाणा, शेंगदाणा दरवाढ, भगरीचे भाव स्थिर

  ‘आषाढी’मुळे मागणीत वाढ; निपाणी बाजारातली चित्र निपाणी (वार्ता) : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर साबुदाणा, शेंगदाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे. यामध्ये साबुदाणा, शेंगदाणाचे भाव वाढले असून भगरीचे भाव स्थिर आहेत. साबुदाण्याच्या क्विंटलच्या दरात ५० ते १०० रुपयांची वाढ झालेली आहे. तर खजूर आणि भगरीचे दर स्थिर आहेत. आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास …

Read More »