Wednesday , December 10 2025
Breaking News

निपाणी

कार – दुचाकी अपघातात दोघे जण जखमी

निपाणी (वार्ता) : येथील अकोळ क्रॉस छत्रपती शिवाजी सांस्कृतिक भवनासमोर भरधाव दुचाकीने कारला पाठीमागून जोराची धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे युवक जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता.११) घडली. हा अपघात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात उदय पाटील (वय १८), सौरभ पाटील (वय २३) दोघेही रा. म्हसोबा हिटणी ता. …

Read More »

शेतकऱ्यांच्या समस्या न सोडवल्यास तीव्र आंदोलन

राजू पोवार : प्रांताधिकार्‍यांच्या चर्चेनंतर निर्णय निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या संदर्भात रयत संघटनेतर्फे वेळोवेळी निवेदन व आंदोलने केली आहेत. तरीही अनेक समस्यांची उकल झालेली नाही. त्यासंदर्भात योग्य ती पावले उचलून तात्काळ शेतकऱ्यांच्या समस्या निकालात न काढल्यास येथील तहसीलदार कार्यालयासमोर संघटनेतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा चिकोडी जिल्हा …

Read More »

राशींगच्या महिलेला दिले जगण्याचे बळ

बेळगाव फेसबुक फ्रेंड सर्कलतर्फे मदत : दिले तीन महिन्याचे अन्नधान्य निपाणी (विनायक पाटील) : राशिंग (ता. हुक्केरी)  येथील रहिवासी बाबुराव मारुती चौगुले (वय४५) यांचे चार दिवसापूर्वी आकस्मिक निधन झाले आहे. घरातील कर्ता पुरुष निघून गेल्यामुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. ही बाब …

Read More »

अमलझरी शर्यतीत नितीन पाटील यांची बैलगाडी प्रथम

विविध धार्मिक कार्यक्रमांची सांगता : मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण  निपाणी (वार्ता) : अमलझरी येथील मसोबा यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमास शर्यतींचे आयोजन केले होते. जनरल बैलगाडी शर्यतीत अमलझरी येथील नितीन पाटील, आडी येथील बल्लू हरेल, अमलझरी येथील साईराम खोत यांच्या बैलगाड्यांनी प्रथम ते तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्यांना श्रीमंत दादाराजे देसाई सरकार …

Read More »

जैन समाजाची तत्त्वे मानवजातीला कल्याणकारी

राजू पोवार : जैनवाडीत पंचकल्याण महोत्सव निपाणी : ‘जगा आणि जगू द्या’ असा संदेश जैन धर्माने समाजाला दिला आहे. त्याचे अनुकरण केल्यास समाज सुखमय होऊ शकतो. या समाजात त्याची वृत्ती असल्याने त्यांचा विकास होत आहे. समाजातील दानत आणि धार्मिक वृत्ती वाखानण्याजोगी आहे. त्यामुळे जैन समाजाच्या आचार विचार देशाला तारत आहेत, …

Read More »

स्नेहसंमेलनानिमित्त शाळेला दिली प्रवेशद्वाराची भेट

वर्गमित्रांनी जपली सामाजिक बांधिलकी : बोरगाव येथील उपक्रम निपाणी (वार्ता) : स्नेहसंमेलन म्हटले की भोजन, मौज मजा, डि.जे. यासह विविध गोष्टींवर अपाट पैसे खर्च करीत असताना दिसते. या सर्व गोष्टींना फाटा देत बोरगाव येथे प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिकलेले वर्गमित्रांनी तब्बल बावीस  वर्षानंतर एकत्र येऊन स्नेहसंमेलन व कृतज्ञता सोहळा कार्यक्रम …

Read More »

सौंदलगा येथे लोहार कुटुंबियांचे पर्यावरणपूरक रक्षा विसर्जन

सौंदलगा : सौंदलगा येथे रक्षाविसर्जन नदीत न करता नवीन झाड लावून त्या रोपास रक्षा घालून पर्यावरणाचा समतोल साधण्याचा प्रयत्न डोंगर भागातील युवक वर्गाकडून होत असून याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. रक्षा विसर्जन नदीत करून जल प्रदूषण होत आहे. झाडांची संख्या कमी झाल्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. याचा विचार करून …

Read More »

वर्ग मित्रांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा निर्धार

1998-99 सालच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा कोगनोळी : पहिलीपासून ते दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सर्व वर्ग मित्रांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा निर्धार करत 1998-99 सालच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक रामचंद्र नवाळे होते. विनायक गायकवाड यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी उपस्थित शिक्षक ए. यु. कमते, कुलकर्णी, ए. पी. …

Read More »

‘दास्य मुक्तीकडून संघर्षाकडे’ उपक्रमात २०० कार्यकर्ते

डॉ. आंबेडकर विचार मंचतर्फे आयोजन : महाड- रायगडला रवाना निपाणी : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त एक वैचारिक संदेश समाजाला मिळावा  यासाठी निसर्गाने निर्माण केलेल्या पाण्यावर प्रस्थापित वर्ण व्यवस्थेने हक्क नाकारला होता. तो आमचा नैसर्गिकदृष्ट्या अधिकार आहे हे सांगण्यासाठी व समता प्रस्तापित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी …

Read More »

शिव-बसव जयंतीत तोडल्या जाती धर्माच्या भिंती!

मोतीवाला सेवा संस्थेकडून सरबत वाटप :शिव-बसव प्रेमींतून समाधान निपाणी : जोल्ले उद्योग समूहातर्फे भव्य शिव-बसव जयंती मिरवणूक सोहळा पार शनिवारी (ता.७) पडला. यावेळी निपाणी शहर व ग्रामीण भागातील हजारो शिव-बसव प्रेमींनी उपस्थित राहून याची देही याची डोळा हा सोहळा अनुभवला. याप्रसंगी १० हजारावर शिव-बसव प्रेमींना मोफत पाणी तसेच ज्यूस वाटप …

Read More »