Wednesday , December 10 2025
Breaking News

निपाणी

उन्हाळ्यामुळे कलिंगडाला मागणी वाढली!

किरकोळ बाजारात ६० ते ७० रुपये नग : दरात दुप्पटीन वाढ निपाणी (वार्ता) : उन्हाळा सुरू होताच कलिंगडाला मागणी वाढली आहे. कलिंगडाच्या सेवनाने शरीरातील पाण्याची पातळी उंचावते, तसेच गारवा मिळतो. उन्हाच्या तडाख्यापासून काही वेळासाठी सुटका होते. लाल बुंद असणाऱ्या टरबुजाचे निपाणी बाजारात यंदादर  वाढले असून ६० ते ७० रुपये नग …

Read More »

ध्येय गाठण्यासाठी गुरूंच्या मार्गदर्शनाची गरज

बी. आर. यादव : कुर्ली हायस्कूलमध्ये सदिच्छा समारंभ निपाणी (वार्ता) : जीवनात अशक्य असे काहीही नाही. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय मोठे ठेवले पाहिजे. कामाच्या योग्य नियोजनामुळे कोणतेही ध्येय गाठणे शक्य आहे.  यशस्वी लोकांच्या जीवन प्रवासाचा अभ्यास केला पाहिजे. आज अनेक लोक सामान्य परिस्थितीतून शिक्षण घेवून यशस्वी झाले आहेत. गुरूंच्या योग्य  मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी …

Read More »

सौंदलगा येथील जागृत देवस्थान श्री रेणुका देवीची यात्रा मंगळवारी

सौंदलगा : कर्नाटक-महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदलगा येथील जागृत देवस्थान श्री रेणुका देवीची यात्रा रंगपंचमी दिवशी मंगळवारी (ता.२२) भरत असून गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे ही यात्रा होऊ शकली नव्हती. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्यामुळे यावर्षी यात्रा मोठ्या प्रमाणात भरणार आहे. यात्रा सोमवार (ता.२१) पासून सुरू होणार असून यात्रेचा मुख्य दिवस मंगळवार …

Read More »

राज्यस्तरीय पुरस्काराने नगरसेवक शौकत मणेर सन्मानित

निपाणी (वार्ता) : दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब यांच्यावतीने येथील नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ता शौकत मणेर यांना पुरस्कार घोषित करण्यात आला होता. रविवारी नवी दिल्ली येथील एका कार्यक्रमात त्यांना पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. शौकात मणेर यांनी पर्यावरण व जैविक विविधता संवर्धनासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत सदर पुरस्कार देऊन त्यांना …

Read More »

रक्तदानाची समाजाला गरज!

निकु पाटील : दौलतराव पाटील फाऊंडेशनतर्फे रक्तदान शिबिर निपाणी (वार्ता) : कोरोना संसर्गामुळे गेल्या दोन वर्षापासून सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत होता. मात्र सध्या हा संसर्ग कमी झाला असला तरीही अनेक रक्तदाते भीतीपोटी रक्तदानासाठी तयार नाहीत त्यामुळे अलीकडच्या काळात सर्वच रक्तपेढीमध्ये रक्कमेचा तुटवडा जाणवत आहे. ही बाब लक्षात घेऊन दौलतराव पाटील …

Read More »

बोरगावमध्ये वळीवाचा अनेक कुटुंबाना फटका!

घरांचे मोठे नुकसान : उत्तम पाटील यांच्याकडून तातडीने मदतीचा हात निपाणी : शनिवारी (ता. १९) बोरगाव आणि परिसरात वादळी वाऱ्यासह वळीवाचा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक घरावरील छत उडून गेल्याने सर्वसामान्य कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले तर काही कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेची माहिती …

Read More »

अरिहंतच्या ३.३२ लाखाच्या शिष्यवृत्तीचे वितरण

संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील : १०३ विद्यार्थ्यांना लाभ निपाणी (वार्ता) : अरिहंत सौहार्द संस्थेच्या सभासदांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने गेल्या सहा वर्षापासून अरिहंत शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. प्रत्येक वर्षी सुमारे शंभर ते दीडशेहून अधिक विद्यार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. यावर्षी दहावी व बारावी परीक्षेत  …

Read More »

‘अंकुरम’च्या विद्यार्थ्यांनी केली दुर्गुणांची होळी!

अनोख्या उपक्रमाचे कौतुक : विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन निपाणी : येथील श्रीनगरमधील अंकुरम इंग्लिश मिडीयम स्कूल येथे विद्यार्थ्यांनी ‘चला करुया दुर्गुणांची होळी’ हा अनोखा उपक्रम शाळेत राबवल्याने दुर्गुणांची होळी पेटली. या जळत्या होळीत विद्यार्थ्याना न आवडणारी, स्वत:मध्ये असलेल्या दुर्गुणांना एका चिठ्ठीवर लिहुन होळीत टाकली. प्राचार्या चेतना चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेल्या या उपक्रमाचे …

Read More »

अंमलझरी तलावाचे काम दर्जेदार व्हावे

नगरसेवक बाळासाहेब देसाई : कामामुळे नागरिकांतून समाधान निपाणी (वार्ता) : नगरोत्थान योजनेतून मंजुर करण्यात आलेल्या अंमलझरी तलावाचे काम प्रशासनाच्या दिरंगाईमुळे प्रलंबित राहिले होते. मात्र आत्ता सुरू झालेले काम लवकरात लवकर पूर्ण होईल, असा विश्वास येथील नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब देसाई -सरकार यांनी व्यक्त केला. ते वॉर्ड नागरिकांच्या वतीने तलावाच्या …

Read More »

बोरगाव नगरपंचायतीचा 14.23 कोटीचा अर्थसंकल्प सादर!

पंचायत इमारत रस्ते, पाणीपुरवठ्यावर भर : 64 हजाराचे शिलकी अंदाजपत्रक निपाणी (वार्ता) : बोरगाव नगरपंचायतीचा सन 2022-23 सालाचा अंतिम सुधारित 14 कोटी 23 लाख, 71हजार 69 रुपयांचा आर्थिक अंदाजपत्रक प्रशासकीय अधिकारी, तहसीलदार डॉ. मोहन भस्मे यांच्या अध्यक्षतेखाली सादर करण्यात आले. यामध्ये 64 हजार 625 रुपये शिलकेचा मूळ अर्थसंकल्प सादर करण्यात …

Read More »