Thursday , September 19 2024
Breaking News

निपाणी

प्रस्तावित तलावाच्या कामासाठी आपण प्रयत्नशील

  पालकमंत्री सतीश जारकीहोळी; प्रशासकीय अधिकाऱ्यांशी विविध विषयावर चर्चा निपाणी (वार्ता) : जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी अचानकपणे निपाणीस भेट देऊन प्रशासकीय अधिकारी, नेते कार्यकर्त्यांशी चर्चा केली केली. निपाणी तालुक्याच्या विकासासाठी माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या सहकार्याने सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. शहरवासीयांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी नवीन प्रस्तावित तलाव कामासाठी आपण …

Read More »

निपाणी पाणी प्रश्नावर खडाजंगी

  अभियंते अधिकारी निरुत्तर: पाणी प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक निपाणी (वार्ता) : शहरातील पाणीप्रश्नासंदर्भात सर्वपक्षीय नगरसेवक, पालिका प्रशासन व कंत्राटदार यांची संयुक्त बैठक नगरपालिकेत शुक्रवारी (ता.५) झाली. यावेळी नगरसेवकांनी कंत्राटदार अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले. याशिवाय पाणीपुरवठ्यात व्यत्यय झाल्यास संबंधितावर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला. नगरसेवक राजू गुंदेशा व संतोष सांगावकर यांनी, …

Read More »

वेदगंगा नदीकाठच्या लोकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

  कोगनोळी : वेदगंगा नदी काठ बचाव कृती समिती यांच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना मांगुर फाटा वेदगंगा नदीवरील पूल भराव हटवून पिलर पुल बांधण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आले. पावसाळ्यामध्ये वेदगंगा नदीला मोठ्या प्रमाणात पूर येत असल्याने व नदीकाठच्या गावात पाणी येत असल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. …

Read More »

राज्यस्तरीय पत्रकार पुरस्काराने निपाणीतील पत्रकार राजेंद्र हजारे सन्मानित

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील पत्रकार राजेंद्र हजारे यांची ‘आढावा महाराष्ट्राचा’ गौरव महाराष्ट्राचा तर्फे राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कारासाठी निवड झाली होती. बुधवारी (ता.३) कोल्हापूर दसरा चौकातील शाहू स्मारकमध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांना कोल्हापूरच्या आमदार जयश्री जाधव, कोल्हापूर जिल्हा गृह उपाधिक्षिका प्रिया पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. …

Read More »

सायबर सुरक्षेबाबत जागृती गरजेची

  वैष्णवी चौगुले; कुर्ली हायस्कूलमध्ये जनजागृती निपाणी (वार्ता) : मानवाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने नवनवीन साधने वापरात आणली. पण त्याचा परिणाम चोरी आधुनिक पद्धतीने होवू लागली. सध्या चोरी, लुटमारी, फसवणुकीचे तंत्र बदलले आहे. त्यामुळे सर्व देशात वाढलेल्या सायबर गुन्हेगारीचे आव्हान चिंतेचे ठरत आहे. यासाठी सायबर गुन्हेगारी बाबत जागृती असणे महत्वाचे असल्याचे मत …

Read More »

बोरगांव ‘जयगणेश’ची निवडणूक बिनविरोध अध्यक्षपदी अभय मगदूम तर उपाध्यक्ष म्हणून सचिन रोड्ड

  निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील जय गणेश मल्टीपर्पज को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. संघाच्या अध्यक्षपदी पुन्हा संस्थेचे संस्थापक अभय मगदूम तर उपाध्यक्षपदी सचिन रोड्ड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून एस. पी. पुजारी हे होते. संघाच्या संचालक मंडळ निवडीत चार नव्या चेहऱ्यांना संधी देत …

Read More »

पत्रकार राजेंद्र हजारे यांची राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कारासाठी निवड

  कोल्हापूर (वार्ता) : निपाणी येथील पत्रकार राजेंद्र हजारे यांची “आढावा महाराष्ट्राचा, गौरव महाराष्ट्राचा”तर्फे राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्याबाबतचे पत्र मुख्य संपादक अनिल सुतार यांनी पाठवले आहे. बुधवारी (ता.३) कोल्हापूर येथील दसरा चौकातील शाहू स्मारक सभागृहात दुपारी २ वाजता या पुरस्काराचे वितरण होणार आहे. पत्रकार राजेंद्र …

Read More »

कर्तृत्व सिद्ध होण्यासाठी स्वप्नावर ठाम रहा

  प्रा. युवराज पाटील; दोशी विद्यालयात पारितोषिक वितरण निपाणी (वार्ता) : आजच्या तरुणांनी केवळ दीड जीबी डेटा संपवणे हे आपले ध्येय न ठेवता, उच्च ध्येय ठेवून कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी आपल्या स्वप्नांवर ठाम रहावे. स्वप्न पूर्ण करताना परिस्थिती नव्हे तर मनस्थिती आड येते. जसे बुद्धिबळाच्या प्याद्यामध्ये वजीर होण्याची ताकद असते, तसेच …

Read More »

माजी आमदार रघुनाथराव कदम यांची पुण्यतिथी गांभीर्याने

  निपाणी (वार्ता) : येथील मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार, उद्योजक रघुनाथराव विठ्ठलराव कदम यांची पुण्यतिथी गुरुवारी (ता.२८) येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात गांभीर्याने झाली. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी निपाणी व परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. येथील मराठा मंडळ संस्कृतीक भवनात निपाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश …

Read More »

निपाणीतील शिबिरात ८४ रुग्णांना श्रवणयंत्र वाटप

  निपाणी (वार्ता) : येथील रोटरी क्लब, बेळगाव रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम आणि अमेरिकेतील बर्मींग होमच्या संयुक्त विद्यमाने येथील रोटरी क्लबमध्ये मोफत श्रवण यंत्राचे वितरण करण्यात आले. रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रवीण उर्फ विरू तारळे यांनी स्वागत केले. निपाणी परिसरात प्रथमच या श्रवण यंत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी वैद्यकीय तपासणीनंतर सुमारे …

Read More »