डॉ. जे.पी. कांबळे; कुर्ली हायस्कूलमध्ये सदिच्छा समारंभ निपाणी (वार्ता) : जीवन ही एक स्पर्धा असून अनेक परीक्षांना आपणास सामोरे जावे लागते. तणावमुक्त वातावरणात परीक्षांना सामोरे गेल्यास यशाचे शिखर गाठता येते. त्यासाठी स्वतःच्या विचारांवर विश्वास ठेवा, गती आणि मती शाबूत ठेवून कष्ट केल्यास यश हमखास मिळते. ग्रामीण भागातील मराठी माध्यमाच्या …
Read More »निपाणीत मंगळवारी गॅरंटी लाभार्थ्यांचा मेळावा
माजी आमदार काकासाहेब पाटील : मराठा मंडळ भवनात कार्यकर्त्यांची बैठक निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने राज्यातील जनतेला पाच गॅरंटी योजना दिल्या होत्या. सत्तेत आल्यानंतर अवघ्या एक वर्षाच्या आतच या पाचही गॅरंटी योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी केली आहे. निपाणी तालुक्यातील हजारो कुटुंबांना याचा लाभ होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मंगळवार …
Read More »पोलिस उपअधीक्षक गोपाळकृष्ण गौडर यांच्याकडून राम मंदिराची पाहणी
निपाणी (वार्ता) : शहर परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जुन्या पी. बी. रोडवरील श्रीराम मंदिर उडवून देणाऱ्या धमकीचे निनावी पत्र मंदिरात मिळाले आहे. याबाबत निपाणी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंद केली असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष आनंद सोलापूरकर यांनी दिली होती. त्यानुसार चिक्कोडीचे पोलीस उपअधीक्षक गोपाळकृष्ण गौडर निपाणीचे मंडळ पोलीस निरीक्षक …
Read More »छोट्या गोष्टीत आनंद घेतल्यास जीवन सुंदर : व्याख्याते गणेश शिंदे
महाशिवरात्री निमित्त आयोजन निपाणी (वार्ता) : जीवन सुंदर निश्चित असा कोणताही फॉर्मुला नाही. परंतु आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घेतला तर जीवन सुंदर होते, असे मत युवा व्याख्याते गणेश शिंदे यांनी व्यक्त केले. येथील महादेव गल्लीतील महादेव मंदिरात आयोजित महाशिवरात्री निमित्त व्याख्यानात ते बोलत होते. शिंदे म्हणाले, आत्म्याशी जे …
Read More »राज्यघटना वाचविण्यासाठी केंद्रात काँग्रेसची सत्ता आवश्यक : राजेंद्र पवार-वड्डर
गळतगा येथे पत्रकार परिषद निपाणी (वार्ता) : देश आणि भारतीय राज्यघटना वाचवायची असेल तर केंद्रात काँग्रेस पक्ष सत्तेवर येणे गरजेचे आहे. त्यासाठी दीनदलित, गोरगरीब व मागासवर्गीयांनी येत्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करून केंद्रात काँग्रेसची सत्ता आणावी,असे असे आवाहन भोज माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर -पवार यांनी केले. गळतगा …
Read More »निपाणी नगरपालिकेत पाच शासननियुक्त नगरसेवक
माजी मंत्री वीरकुमार पाटील : नगरसेवकांनी शहराचा विकास साधावा निपाणी (वार्ता) : कर्नाटकात काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर शासननियुक्त पदांच्या निवडी व्हाव्यात यासाठी आपणासह माजी आमदार काकासाहेब पाटील, चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी एकत्रित चर्चा केली. सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळावी, यासाठी या पदांवर योग्य नावांची शिफारस केली. त्यानुसार …
Read More »लष्करात निवड झालेल्या कुर्ली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयाच्या १० माजी विद्यार्थ्यांची लष्करात निवड झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. एस. चौगुले होते. टी. एम. यादव यांनी स्वागत केले. मुख्याध्यापक चौगुले यांच्या हस्ते गिरीश लोहार, सुमित पाटील, संकेत पोवार, प्रथमेश देसाई, विजय व्हराटे, …
Read More »पूजा शेलार ठरल्या पैठणीच्या मानकरी
निपाणीत होम मिनिस्टर स्पर्धा ; १०० पेक्षा अधिक महिलांचा सहभाग निपाणी (वार्ता) : महादेव गल्लीतील महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त आयोजित ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेत पूजा प्रमोद शेलार यांनी पैठणी पटकावली. श्रुती संदीप मुत्तगी यांनी दुसऱ्या क्रमांकाची चांदीची समई आणि शितल संजय घाटगे यांनी तिसऱ्या क्रमांकाची एलईडी टीव्ही पटकावली. लक्ष्मी सुभाष माळकरी …
Read More »‘अरिहंत’ चषक क्रिकेट स्पर्धेचे निपाणीत उद्घाटन ४५ संघांचा सहभाग
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूहतर्फे श्री छत्रपती शिवाजीनगर फ्रेंड सर्कल यांच्या संयोजनाखाली समर्थ मंडळ व्यायाम शाळेच्या मैदानावर आयोजित ‘अरिहंत चषक’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी (ता.६) झाले. या स्पर्धेत ४५ संघानी सहभाग घेतला आहे प्रारंभी बोरगाव येथील पृथ्वीराज अभिनंदन पाटील यांच्या हस्ते यष्टी पूजन, नगरसेवक …
Read More »निपाणीत बुधवारपासून ‘अरिहंत’ चषक क्रिकेट स्पर्धा तयारी पूर्ण; उत्तम पाटील यांच्याकडून पाहणी
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूह व उत्तम पाटील युवा मंचतर्फे बुधवारपासून (ता.६) अरिहंत चषक टेनिस बॉल क्रिकेट होणार आहेत. येथील समर्थ व्यायाम शाळेच्या मैदानावर या स्पर्धा होणार आहेत. त्याची तयारी पूर्ण झाली असून परिसरातील क्रिकेट प्रेमींनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन सहकारत्न उत्तम पाटील यांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta