Sunday , July 26 2026
Breaking News

लष्करात निवड झालेल्या कुर्ली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा सत्कार

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयाच्या १० माजी विद्यार्थ्यांची लष्करात निवड झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. एस. चौगुले होते.
टी. एम. यादव यांनी स्वागत केले. मुख्याध्यापक चौगुले यांच्या हस्ते गिरीश लोहार, सुमित पाटील, संकेत पोवार, प्रथमेश देसाई, विजय व्हराटे, धनाजी पिष्टे, शुभम पाटील, सोमनाथ यादव, निखिल कोकणे, अजित आमणे यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
मुख्याध्यापक चौगुले यांनी, जिद्द, चिकाटी व अथक परिश्रम याच्या सहाय्याने लष्करात दाखल होण्याचे स्वप्न साकार केले. आजपर्यंत या विद्यालयातील पाचशेहून अधिक माजी विद्यार्थ्यांनी योगदान दिले असून सर्वांचा आम्हाला अभिमान असल्याचे सांगितले.माजी विद्यार्थ्यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमास एस. ए. पाटील, एस. एस. साळवी, के. ए. नाईक, एम. बी. खिरुगडे, ए. व्ही. पाटील, यु. पी. पाटील, व्ही. टी. साळुंखे, एस. एल. कुंभार यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. ए. ए. चौगुले यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

कारगिल विजय दिनासह सुगते कुटुंबीयांच्या जन्मदिनी वृक्षारोपण

Spread the love  शहीदांना हरित अभिवादन; भूमी वात्सल्य फाउंडेशनचा पर्यावरणपूरक उपक्रम निपाणी (वार्ता) : कारगिल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *