Saturday , June 6 2026
Breaking News

निपाणीत बुधवारपासून ‘अरिहंत’ चषक क्रिकेट स्पर्धा तयारी पूर्ण; उत्तम पाटील यांच्याकडून पाहणी

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूह व उत्तम पाटील युवा मंचतर्फे बुधवारपासून (ता.६) अरिहंत चषक टेनिस बॉल क्रिकेट होणार आहेत. येथील समर्थ व्यायाम शाळेच्या मैदानावर या स्पर्धा होणार आहेत. त्याची तयारी पूर्ण झाली असून परिसरातील क्रिकेट प्रेमींनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन सहकारत्न उत्तम पाटील यांनी केले. स्पर्धेच्या मैदानासह इतर व्यवस्थेची पाहणी करून ते बोलत होते.
पाटील म्हणाले, प्रथम क्रमांकासाठी १ लाख, व्दितीय ५० हजार, तृतीय क्रमांकास २५ हजार रुपये अशी बक्षिसे आहेत. याशिवाय मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द मॅच फायनल अशी वैयक्तिक बक्षिसे दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. बुधवारी (ता.६) सकाळी दहा वाजता सहकाररत्न उत्तम पाटील, अरिहंत उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, डॉ. सी. बी. कुरबेट्टी, धनंजय मानवी, नगरसेवक रवींद्र शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत. यावेळी माजी नगरसेवक दिलीप पठाडे, नगरसेवक शौकत मनेर, विनायक वडे, प्रा. बाळासाहेब सुर्यवंशी, स्पर्धा संयोजक सतीश शिरगावे, इम्रान मकानदार, शिरीष कमते, बंटी कांबळे, बबलू मांगोरे, अभिजित सांडुगडे, संतोष कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

सायकलच्या चाकाला ‘महागाईचा ब्रेक’; जानेवारीपासून चौथ्यांदा दरवाढ

Spread the love  स्पेअरपार्टच्या लहान कंपन्या अडचणीत निपाणी (वार्ता) : इंधन दरवाढ होण्यासह आरोग्यासाठी सायकल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *