Wednesday , April 22 2026
Breaking News

शाहू महाराजांच्या उमेदवारीवरुन संभ्रम; कोल्हापूरची जागा आमचीच : संजय राऊत

Spread the love

 

कोल्हापूर : एकीकडे राज्यातील जागांवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता असली तरी कोल्हापूर लोकसभेच्या जागेवरुन मविआत संभ्रम असल्याचं चित्र दिसून येतंय. कोल्हापूरची जागा ही शाहू महाराज छत्रपतींनी लढवावी असं तिन्ही पक्षांनी ठरवल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. तर दुसरीकडे शाहू महाराज छत्रपतींशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणत आहेत. त्यामुळे कोल्हापूरच्या उमेदवारीवर एकमत असलं तरी ही जागा कुणी लढवावी याबाबत मात्र संभ्रम कायम आहे.

महाविकास आघाडीमधला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला. तिन्ही पक्षांनी शाहू महाराज छत्रपतींनी निवडणूक लढवावी असं ठरवल्याचं नाना पटोलेंनी सांगितलं. पण शाहू महाराज छत्रपतींनी कोणत्या चिन्हावर लढावं हे ठरलं नसल्याचं नाना पटोलें म्हणाले. त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मात्र ही जागा शिवसेनेची असून शाहू महाराज छत्रपतींशी कुठलीही चर्चा झालीच नसल्याचं म्हंटलंय. त्यामुळे कोल्हापूरच्या जागेवरून अजूनही मविआत संभ्रम असल्याचं चित्र आहे.

शिवसेनेसोबत चर्चा झाली नाही, संजय राऊतांचा दावा
नाना पटोलेंच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची आहे. पण शिवसेनेची शाहू महाराजांसोबत कोणतीही चर्चा झालेली नाही. आता महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांना शाहू महाराजांसोबत उमेदवारीवर चर्चा करावी लागेल. त्यानंतर शाहू महाराजांना शिवसेनेच्या मशाल या चिन्हावर निवडणूक लढवण्याची विनंती करावी लागेल. त्यावर शाहू महाराजांची त्यासाठी तयारी आहे का हे पाहावं लागेल.

About Belgaum Varta

Check Also

कोल्हापूरात कार चालकाने वाहनांना उडवले; मुलगी- वडील ठार, दोघे जखमी

Spread the love  कोल्हापूर : चुकीच्या दिशेने निघालेल्या भरधाव मोटारीने चार वाहनांना उडवले. हा वाहनधारक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *