Sunday , September 8 2024
Breaking News

संकेश्वर

राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनाचे काम पूर्ण करा; शहरवासीयातर्फे निवेदन

  निपाणी (वार्ता) : राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनाचे काम बऱ्याच वर्षापासून रखडले आहे. तात्काळ निधी मंजूर करून त्याचे काम पूर्ण करावे, यासह विविध समस्या सोडवण्याबाबतचे निवेदन माजी नगराध्यक्ष प्रवीण भाटले यांच्या नेतृत्वाखालील माजी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष, माजी सभापती, नगरसेवकांनी पालकमंत्र्यांना दिले. माहिती अशी, उद्यानाचे सुशोभीकरण, विकासकामे, जनरेटर व पूलिंग यांसारख्या …

Read More »

मतदार संघात समस्या शिल्लक राहणार नाहीत

  पालकमंत्री सतीश जारकीहोळी; पालकमंत्र्यांचा निपाणी दौरा निपाणी (वार्ता) : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतिश जारकीहोळी यांनी सोमवारी (ता.१७) निपाणी दौरा केला. येथील शासकीय विश्राम धामावर त्यांनी निपाणी मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. शिवाय अनेकांनी विविध समस्याबाबत निवेदने दिली. लवकरच समस्यामुक्त निपाणी मतदारसंघ करण्याचे आश्वासन दिले. …

Read More »

निपाणी मतदारसंघाचा कायापालट करणार : खासदार प्रियांका जारकीहोळी

  निपाणीत शुभेच्छांचा वर्षाव निपाणी (वार्ता) : चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील निपाणी विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी आपल्यावर विश्वास ठेवून लोकसभेमध्ये पाठवले आहे. त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी निपाणी मतदारसंघाचा विकासाच्या माध्यमातून कायापालट करण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही नूतन खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी दिली. खासदारपदी निवड झाल्यानंतर प्रियांका जारकी होळी यांनी पहिल्यांदाच निपाणी मतदारसंघात …

Read More »

भेदभाव न करता विकास कामे राबवणार : खासदार प्रियांका जारकीहोळी

  शरद पवार राष्ट्रवादी गटातर्फे सत्कार निपाणी (वार्ता) : आपल्या विजयामध्ये निपाणी मतदारसंघातील नेते मंडळी कार्यकर्ते व मतदारांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. सहकारत्न उत्तम पाटील यांनी आपल्या बहिणीला निवडून दिले आहे. याची जाणीव ठेवून काँग्रेससह राष्ट्रवादी पक्षाची कामे वडिलांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहे. लवकरच निपाणी आणि चिकोडी येथे कार्यालय सुरू करून सर्वांच्या …

Read More »

प्रियांका जारकीहोळी यांच्या विजयामुळे निपाणीत कार्यकर्त्यांचा जल्लोष

  निपाणी (वार्ता) : लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी (ता.४) जाहीर झाला. त्यापार्श्वभूमीवर नागरिकांनी दूरचित्रवाणी आणि प्रसार माध्यमावर निकाल पाहत घरीच बसल्याने सकाळी रस्त्यावर शुकशुकाट होता. दुपारी काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका सतीश जारकीहोळी या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्यानंतर येथील काँग्रेस कार्यालयासह चौका चौकात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. …

Read More »

संकेश्वर बायपास रस्त्यावर वाहनांवर दगडफेक करून प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न

  संकेश्वर : संकेश्वर बायपास रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास चालत्या वाहनांवर दगडफेक केल्याची घटना 30 मे रोजी मध्यरात्री 12 ते 1 च्या सुमारास घडली. अंधाराचा फायदा घेत वाहनांवर दगडफेक करून लुटण्याचा प्रयत्न असल्याची शंका प्रवाशांतून व्यक्त होत आहे. 30 मे रोजी मध्यरात्री संकेश्वर बायपास रस्त्यावर चालत्या वाहनावर दगडफेक करून वाहने अडविण्याचा …

Read More »

कर्ज फेडण्यास विलंब झाल्याने पत्नी- मुलाला ठेवले नजरकैदेत; कंटाळलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या

  हुक्केरी : कर्जफेडीला दिरंगाई केल्याने महिलेने शेतकऱ्याच्या पत्नी आणि मुलाला आपल्या घरात नजरकैदेत ठेवल्याने एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना हुक्केरी येथील इस्लामपूर येथे घडली. राजू खोतगी असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, गावातील सिद्धव्वा बायन्नावर नावाच्या महिलेकडे मयत राजू यांनी ५ …

Read More »

नुकसानग्रस्तांना भरपाई देणार : पालकमंत्री सतीश जारकीहोळी

  निपाणी परिसरात नुकसानीची पाहणी निपाणी (वार्ता) : वादळी वारे व पावसामुळे निपाणी तालुक्यात अनेक घरे, गॅरेज, दुकान, मालमत्तेसह झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा सर्व्हे करून पंचनाम्यासह तात्काळ नुकसान भरपाई दिली जाईल. तसा आदेश तहसीलदारांना दिल्याची माहिती पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब …

Read More »

बेळगाव लोकसभा मतदारसंघात 71.38 टक्के तर चिक्कोडीत 78.51 टक्के मतदान

  बेळगाव : लोकशाहीचा सण असलेली निवडणूक शांततेत पार पडली असून चिक्कोडी लोकसभा मतदारसंघ 78.51 टक्के तर बेळगाव लोकसभा मतदारसंघ 71.38 टक्के तसेच बेळगाव जिल्ह्यातील खानापूर विधानसभा मतदारसंघात 73.87 टक्के आणि कॅनरा लोकसभा मतदारसंघातील कित्तूर विधानसभा मतदारसंघात 73.87 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. एकूण गतवेळच्या तुलनेत …

Read More »

बेळगावात २४.०२ तर चिक्कोडीत २७.२३ टक्के मतदान

  बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत २४.०२ टक्के तर चिक्कोडीत २७.२३ टक्के मतदान झाले आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघातील बेळगाव शहर परिसरात विविध ठिकाणी मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी मतदानाला सुरुवात केली आहे. मतदारांनी मतदानासाठी सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला आहे. वाढत्या उन्हामुळे वयोवृद्ध तसेच महिलांना मतदान केंद्राकडे जाण्यास त्रास …

Read More »