संकेश्वर : ग्रामदैवत जगद्गुरु शंकराचार्य संस्थान मठाचा रथोत्सव आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यात्रेचा आज मुख्य दिवस असल्याने मठगली परिसरात दुतर्फा लहान-मोठे दुकाने गर्दी झाली
होती. दुपारी चारच्या सुमारास संस्थान मठाचे मठाधिपती जगद्गुरु श्री सच्चिदानंद अभिनव विद्या नरसिंह भारती स्वामी यांनी नारायण मंदिरकडे नारायण मंदिर कडे पालखीतून प्रस्थान केले. त्या ठिकाणी असलेल्या भव्य अशा सजवलेल्या लाकडी रथाची विधीपूर्वक पूजा करून रथात विराजमान झाल्यावर उपस्थित भाविकांनी हर हर महादेवच्या गजरात रथ ओढण्यास प्रारंभ केला. रात्री आठच्या सुमारास सदर रथ मुख्य शंकराचार्य मठाकडे दोरखंडाच्या सहाय्याने ओढत आणण्यात आला.
मुख्य शंकर लिंग मठाच्या प्रांगणात पालखी मिरवणूक व स्वामींच्या उपस्थित महाआरती संपन्न झाली. हेमाडपंती शैलीचे असणारे हे मंदिर कोरीव नक्षी कामावर आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने उपस्थित भाविकांचे लक्ष वेधून घेतले जात होते. खबरदारीचा उपाय म्हणून संकेश्वर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.
दरम्यान आमदार निखिल कत्ती यांनी शंकराचार्य मठास भेट देऊन देवदर्शन घेतले तर रथोत्सव कार्यक्रमात सौ. सीमा हातनुरे, उपनगराध्यक्ष विवेक कोळ्ळी, हिरा शुगर संचालक आप्पासाहेब शिरकोळी, माजी नगराध्यक्ष अमर नलवडे, श्रीकांत हातनुरे, अभिजीत कुरणकर, गजानन कळ्ळी, मठाचे सचिव अर्जुन कानवडे व ब्रह्मावृंद आदीसह मठाचे हकदार व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.