संकेश्वर : संकेश्वर येथील दत्त पंत मंदिर श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने स्वामी समर्थ प्रकट दिन दूरदुंडेश्वर भवनात साजरा झाला.
सकाळी स्वामींच्या प्रतिमेचे पूजन व भूपाळी झाली. दरम्यान सारामृत पारायणाची पोथी २०० हून अधिक सेविकाऱ्यांनी वाचन केले. यावेळी नारायण फलसे, संतोष मगदूम यांच्याहस्ते महाआरती झाली.
शंकराचार्य मठाचे सच्चिदानंद अभिनव विद्या नरसिंहभारती स्वामींच्या “दिव्य सानिध्यात”. आमदार निखिल कत्ती यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घघाटन झाले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सीमा हतनुरे होत्या.
यावेळी प्रा.तुकाराम म्हस्के (पंढरपूर) म्हणाले, सात्विक भाव जीवनात हवा यास नामस्मरण व तारकमंत्राची साथ हवी म्हणूनच संगत व पंगत चांगली असावी. अन्यथा चुकल्यास आयुष्य व्यर्थ जाते असे सांगितले. शेवटी”मांदियाळीने” कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी डॉ. नंदकुमार हावळ, दीपक बोगाळे, राजू फडके, राहुल मुगळी, देवदास मानगावकर, कुमार संसूधी, अमर थोरवत, अण्णासो इंगळे, राघोबा गुरव, पुनम यादव, पूजा सुतार, रोहिणी जरली, आरती चव्हाण, कोमल जोंधळे, शशिकला देवघोजी, अमृता अंमनगी सह अनेकांची उपस्थिती होती.
प्रास्ताविक विनायक सुगते, आभार अनिल जवंजाळ तर सूत्रसंचलन शशिकला मोरे यांनी केले.