दड्डी : मनगुती ता. हुक्केरी येथील प्राथमिक मराठी शाळा मनगुती व दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव संचलित लाल बहादूर शास्त्री विद्यालय मनगुती येथे ई. 2001-2002.. मध्ये इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला. तब्बल 25 वर्षांनी या कार्यक्रमाचे नियोजन झाल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पहावयास मिळाले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विक्रम पाटील होते. सर्व आजी-माजी शिक्षकांचे पुष्पगुच्छ टाकून स्वागत करण्यात आले. त्यानंतर मूर्त शिक्षक व विद्यार्थ्यांना आदरांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक पुष्पा होडगे व कविता मेंडुले यांनी केले. दीप प्रज्वलन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले फोटो पूजन सुधा टोपकर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी सर्व आजी-माजी शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. भीमसेन कोतेकर, दीपक पाटील, सविता सुतार, यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
पुष्पा होडगे, संजय कोतेकर, मारुती उक्कोजी, मनोगत व मार्गदर्शन केले. सुबराव पाटील, किशन चव्हाण, श्रीकांत अर्धाळकर, लव्ह मेंडुले, जोतिबा शिंदे, जोतिबा मेंडुले, अंकुश मेंडुले, सुभाष पाटील, बाळू पाटील, भीमसेन कोतेकर यांच्यासह आजी- माजी शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुती पाटील यांनी केले. दुपारी जेवणानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली.