मुंबई : भारतीय संघातील नामवंत क्रिकेटपटून विराट कोहली याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट करत त्याने हा निर्णय जाहीर केला आहे. रोहित शर्मापाठोपाठ विराटनेही कसोटी क्रिकेटला अलविदा केल्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी मात्र ही अतिशय वाईट बातमी असून लाखो चाहत्यांचे हृदयभंग झालाय हे निश्चितच!
सोशल मीडियावर पोस्ट लिहीत निर्णय केला जाहीर
14 वर्षांच्या टेस्ट क्रिकेटच्या कारकिर्दीला अखेर जड अंत:करणाने अलविदा करत असल्याचे सांगत विराटने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे.
ते स्वप्न अखेर अधुरंच…
विराटने इन्स्टावरील पोस्टमध्ये बऱ्याच गोष्टी नमूद केल्या. कसोटी क्रिकेटमधील हा प्रवास मी हसतमुखाने पाहीन असं त्याने लिहीले असले तरी आयुष्यातील एक स्वप्न अधुरे राहिल्याचे दु:ख कायम त्याच्या मनात सलत राहील. विराटचे ते स्वप्न कसोटीतील 10 हजार धावांशी निगडीत आहे. ते पूर्ण न करताच त्याने कसोटी क्रिकेटच्या या फॉरमॅटला अलविदा केलं.
विराटचे टेस्ट करिअर
विराट कोहलीने त्याच्या 14 वर्षांच्या कारकिर्दीत 123 कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 210 डावांमध्ये 46.85 च्या सरासरीने 9230 धावा केल्या. पण विराट त्याच्या 10 हजार कसोटी धावांच्या स्वप्नापासून अवघा 770 धावा दूर होता. विराट कोहलीची कसोटी शतके आणि अर्धशतकांची संख्या जवळजवळ समान आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 30 शतके आणि 31 अर्धशतके झळकावली आहेत.
विराटचे एकूण क्रिकेट करिअर
123 टेस्ट, 210 इनिंग्स, 9230 रन, 46.85 ॲव्हरजे, 30 शतक, 31 अर्धशतक 302 वनडे, 290 इनिंग्स, 14181 रन, 57.88 ॲव्हरेज, 51 शतक, 74 अर्धशतक, 5 विकेट 125 टी20, 117 इनिंग्स, 4188 रन, 48.69 ॲव्हरेज, 1 शतक, 38 अर्धशतक, 4 विकेट