Monday , October 5 2026
Breaking News

बेळगावमध्ये रंगणार कर्नाटक- छत्तीसगड यांच्यात रणजी सामना

Spread the love

 

बेळगाव, क्रीडा प्रतिनिधी : बीसीसीआयच्या मान्यतेने कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या (KSCA) वतीने आयोजित रणजी चषक स्पर्धेतील सामना येत्या १७ जानेवारी २०२७ रोजी बेळगावच्या केएससीए क्रिकेट स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे. या सामन्यात यजमान कर्नाटक आणि छत्तीसगड हे दोन बलाढ्य संघ आमनेसामने येणार आहेत.

रणजी चषकाच्या एलिट गटातील ‘ब’ गटातील हा सामना असून, यंदाचा रणजी मोसम ११ ऑक्टोबर २०२६ ते २ मार्च २०२७ या कालावधीत होणार आहे. देशभरातील विविध मैदानांवर एकूण ११९ सामने खेळविले जाणार आहेत.

कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या कार्यकारी मंडळाने क्रिकेटचा प्रसार आणि लोकप्रियता वाढविण्यासाठी बंगळुरूसोबतच म्हैसूर, हुबळी आणि बेळगावसारख्या मोफत्सिल भागांतील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना मोठ्या सामन्यांचा अनुभव मिळावा, या उद्देशाने या शहरांना रणजी सामन्यांचे यजमानपद देण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

बेळगावच्या केएससीए क्रिकेट स्टेडियमवर यापूर्वी २०१६ मध्ये बीसीसीआयच्या मान्यतेने गुजरात विरुद्ध पंजाब आणि गुजरात विरुद्ध तामिळनाडू असे रणजी सामने खेळविण्यात आले होते. त्यावेळी गुजरातचा कर्णधार प्रियांक पांचाळ यांनी बेळगावच्या मैदानावर उल्लेखनीय फलंदाजी करत शतकी आणि द्विशतकी कामगिरी नोंदविली होती.

२०१६ नंतर तब्बल ११ वर्षांनी म्हणजेच २०२७ मध्ये बेळगावकरांना पुन्हा रणजी सामना प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर केएससीए स्टेडियमवरील क्रिकेट खेळपट्टीसह मैदानाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. सामन्याच्या आयोजनासाठी मैदान सज्ज करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

टीम इंडियाची सुपर 8 मध्ये धडक, पाकिस्तानचा 61 धावांनी धुव्वा

Spread the love  कोलंबो : आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 27 व्या सामन्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *