Monday , October 5 2026
Breaking News

श्री गणेश ग्रामीण बॉडीबिल्डिंग स्पर्धेत सुनिल भातकांडे ठरला ‘टायटल विनर’

Spread the love

 

बेळगाव : श्री गणेश ग्रामीण स्तरावरील बॉडीबिल्डिंग स्पर्धा २०२६ चे आयोजन टिळकवाडी येथील रामनाथ मंगल कार्यालयात करण्यात आले. विविध वजनी गटांत झालेल्या या स्पर्धेत शरीरसौष्ठवपटूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करत प्रेक्षकांची दाद मिळवली.

५५ किलो वजनी गटात पांडुरंग पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला. आकाश जोगाणी द्वितीय, प्रथमेश निर्मळे तृतीय, शुभम चौगले चौथा, तर मारुती पाटील यांनी पाचवा क्रमांक मिळवला.

६० किलो गटात गणेश सोनाळकर प्रथम, शुभम मोडगेकर द्वितीय, मंजुनाथ काळघटगी तृतीय, ऋषभ गोवेकर चौथा आणि पांडुरंग गुरव पाचव्या क्रमांकावर राहिले.

६५ किलो गटात अक्षय मुतगेकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला. आफताब किल्लेदार द्वितीय, ईरेश प्रभाळकर तृतीय, पृथाम कोळकर चौथा आणि अनिल भवरा यांनी पाचवा क्रमांक पटकावला.

६५ किलोपेक्षा अधिक वजनी गटात सुनिल भातकांडे यांनी प्रथम क्रमांक मिळवत स्पर्धेचा ‘टायटल विनर’ किताब पटकावला. प्रवीण मजुकर द्वितीय, अमर गुरव तृतीय, पवन सावंत चौथा आणि गिरिराज पाटील पाचव्या क्रमांकावर राहिले.

या स्पर्धेतील पारितोषिकांची रक्कम एमएसबी न्यूट्रिशनतर्फे अॅड. ईश्वर घाडी यांनी प्रायोजित केली.

स्पर्धेला अतुल शिरोळे, तानूबा मोरे, नवीन कुमार, अनिल जैन, अमित किल्लेकर, सुरेश मुरकुंबी, मोतीचंद दोरकडी, सचिन हांगीर्गेकर, गंगाधर एम., अजित सिद्धण्णावर, मिलिंद पटणेकर, राजू नलावडे, दयानंद बाळेकुंद्री, हेमंत हवाल आणि सुनील आपटेकर यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.

स्पर्धेतील विजेत्या आणि सहभागी शरीरसौष्ठवपटूंचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले.

About Belgaum Varta

Check Also

आयएमएच्या बेळगाव शाखाध्यक्षपदी डॉ. सविता कद्दू, सचिव पदी डॉ. माधव प्रभू

Spread the love  बेळगाव : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) च्या बेळगाव शाखेच्या नूतन अध्यक्षपदी डॉ. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *