Monday , October 5 2026
Breaking News

जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत बेळगाव शहराचे वर्चस्व

Spread the love

 

 

 

चारही गटांत विजेतेपद; विभागीय स्पर्धेसाठी संघ पात्र

बेळगाव : टिळकवाडी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय प्राथमिक व माध्यमिक मुला-मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत बेळगाव शहराने चारही गटांत विजेतेपद पटकावत वर्चस्व सिद्ध केले.

प्राथमिक मुलांच्या गटात अंतिम सामन्यात सेंट झेवियर्स स्कूल, बेळगाव शहर संघाने सेंट फ्रान्सिस स्कूल, उचगाव (बेळगाव ग्रामीण) संघाचा १-० असा पराभव केला. विजयी संघाकडून फौजान शेखने निर्णायक गोल केला.

प्राथमिक मुलींच्या गटात सेंट जोसेफ स्कूल, बेळगाव शहर संघाने सेंट जोसेफ स्कूल, संतिबस्तवाड (बेळगाव ग्रामीण) संघावर २-० असा विजय मिळवला.

माध्यमिक मुलींच्या गटात सेंट झेवियर्स स्कूल, बेळगाव शहर संघाने सेंट जोसेफ स्कूल, संतिबस्तवाड संघाचा १-० असा पराभव केला. श्रद्धा पाटीलने विजयी संघासाठी एकमेव गोल केला.

माध्यमिक मुलांच्या गटात संत मीरा स्कूल, अनगोळ (बेळगाव शहर) संघाने सर्वोदय स्कूल, खानापूरचा १-० असा पराभव केला. समर्थ पनारीने पेनल्टी शूटआउटमध्ये निर्णायक गोल नोंदवत संघाला विजेतेपद मिळवून दिले.

स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला माजी राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू प्रणय शेट्टी, शिवाजी कॉलनी फुटबॉल संघटनेचे पवन कांबळे, संतोष दळवी, प्राथमिक शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष रमेश सिंगद, जयसिंग धनाजी, प्रवीण पाटील, बापू देसाई, चंद्रकांत पाटील, महेश हगीदळी, उमेश मजुकर, हर्ष रेडेकर, सुनीता जाधव, ज्युलेट फर्नांडिस, येस्तारानी, आय. एम. पटेल, पी. एस. कुरबेट, सुभाष गंभीर, चंद्रशेखर तोगरी, दोडमणी आदी उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना आकर्षक चषक, प्रमाणपत्रे व पदके देऊन गौरविण्यात आले. जिल्हास्तरीय स्पर्धेतील चारही विजेते संघ आगामी विभागीय फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

मटका जुगार अड्ड्यावर काकती पोलिसांचा छापा; एक ताब्यात

Spread the love  बेळगाव : अवैधरीत्या मटका जुगार चालविणाऱ्या अड्ड्यावर काकती पोलिसांनी छापा टाकून एका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *