Friday , November 6 2026
Breaking News

तीन वेळचा आशियाई सुवर्णपदक विजेता पॅरा ॲथलीट नीरज यादव यांची आत्महत्या

Spread the love

 

नवी दिल्ली : भारतीय क्रीडा जगताला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. तीन वेळा पॅरा आशियाई सुवर्णपदक पटकावणारे प्रसिद्ध पॅरा ॲथलीट नीरज यादव (वय ४२) यांचे निधन झाले. त्यांनी मंगळवारी रात्री आपल्या फ्लॅटमध्ये विषारी पदार्थ प्राशन केल्याची माहिती समोर आली आहे.

नीरज यादव हे ॲथलेटिक्समधील एफ-५५ (F55) प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करत होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी उल्लेखनीय कामगिरी करत त्यांनी तीन वेळा आशियाई सुवर्णपदक जिंकले होते. त्यांच्या निधनामुळे भारतीय पॅरा क्रीडा क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

या घटनेनंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. दरम्यान, दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे वृत्त आहे.

नीरज यादव यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमागील परिस्थितीचा तपास सुरू असून, अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

भारतीय क्रीडा क्षेत्रातील एका प्रतिभावान खेळाडूच्या निधनाने क्रीडाप्रेमींमधून हळहळ व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

भारत सलग दुसऱ्यांदा विश्वविजेता; अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 96 धावांनी धुव्वा

Spread the love  अहमदाबाद : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज भारतीय क्रिकेटने नवा इतिहास रचला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *